महाराष्ट्राला नावाप्रमाणे महान घडवूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:00+5:302021-05-03T04:12:00+5:30

रामचंद्र पाटील : नोबेल फाउंडेशनतर्फे व्याख्यान जळगाव : महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र अशा नावातच महानता आहे. अशा या महाराष्ट्र ...

Let's make Maharashtra great as the name suggests | महाराष्ट्राला नावाप्रमाणे महान घडवूया

महाराष्ट्राला नावाप्रमाणे महान घडवूया

रामचंद्र पाटील : नोबेल फाउंडेशनतर्फे व्याख्यान

जळगाव : महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र अशा नावातच महानता आहे. अशा या महाराष्ट्र राज्याला आपण सर्व मिळून महान घडवू या, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व लेखक रामचंद्र पाटील यांनी केले.

नोबेल फाउंडेशन जळगाव आणि ओमकार करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित व्याख्याना मध्ये ते बोलत होते.

या वेळी नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यापुढे

रामचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक तसेच भौगोलिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र आहे. देशाच्या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महानुभाव ग्रंथाच्या लीळा चरित्र ग्रंथांमध्ये महाराष्ट्राचे वर्णन महंत राष्ट्र असे केलेले आहे. तर सातवाहन काळात या राज्याला महान लोकांचे राज्य असे म्हटले गेले असल्याचेही पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी केले. तर आभार अमोल पवार यांनी मानले.

Web Title: Let's make Maharashtra great as the name suggests