चोरटे लवकरच गजाआड करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:16+5:302021-07-08T04:13:16+5:30
यावल : बाजीराव काशिदास कवडीवाले या सराफ दुकानात भरदुपारी एक वाजेच्या सुमारास शहरात घडलेली घटना गंभीर स्वरूपाची आहे. ...

चोरटे लवकरच गजाआड करू
यावल : बाजीराव काशिदास कवडीवाले या सराफ दुकानात भरदुपारी एक वाजेच्या सुमारास शहरात घडलेली घटना गंभीर स्वरूपाची आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग या घटनेचा तपास आपल्या पातळीवरून करणार असून, चोरट्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्याचबरोबर मंगळवारी एका कंपनीच्या एजंटच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याकडील ५५ हजार रुपये लंपास केले. ही घटनासुद्धा पोलिसांनी गंभीरतेने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवस घडलेल्या या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
देशी कट्टा, सहा जिवंत काडतुसे जप्त
घटनेनंतर पळ काढताना दरोडेखोरांकडून दोन देशी कट्टे ५० फूट अंतराच्या रस्त्यावर पडले. या कट्ट्यांत एकामध्ये पाच, तर एकामध्ये एक असे सहा जिवंत काडतुसे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी भुसावळ जळगाव येथे घडलेल्या घटना संदर्भात पोलीस विभागाकडून सराफ बाजारात बंदोबस्त देण्यात आला होता मात्र तो नंतर बंद करण्यात आला या प्रश्नावर पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक सराफ व्यावसायिक असा बंदोबस्त देणे शक्य नाही मात्र यापुढे गस्त वाढवली जाईल, असे त्यांनी सांगितले.