शेतात लोंबकळल्या जीवघेण्या वीजतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 21:45 IST2019-07-10T21:45:28+5:302019-07-10T21:45:34+5:30
पहूर, ता.जामनेर : लोंढ्रीतील घटना घडल्यानंतर पहूर शिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जीवघेण्या विद्युत तारा लोंबकळत असल्याचे समोर आले आहे. ...

शेतात लोंबकळल्या जीवघेण्या वीजतारा
पहूर, ता.जामनेर : लोंढ्रीतील घटना घडल्यानंतर पहूर शिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जीवघेण्या विद्युत तारा लोंबकळत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शेतकºयाने महावितरणच्या उपविभागाकडे तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, एक महिना उलटला तरी या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पहूर शिवारातील गटनंबर ९४३/२ मधील राजेंद्र पिंताबर कलाल यांच्या शेतात कित्येक दिवसांपासून जीवघेण्या विद्युततारा लोंबकळत आहेत. या ठिकाणी शेताच्या बांधावर ट्रान्सफॉर्मर बसविला असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून या तारा गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतीकीमासाठी गाडीबैल नेताना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. या तारांमध्ये उच्च प्रवाह सुरू असल्याने शेतीमालक भयभीत झाले आहेत.
महावितरणचा हा प्रकार शेशेतकºयांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महावितरण उपविभागाचे कनिष्ठ अभियंता संजय सरताळे यांना ८ जून रोजी तक्रार अर्ज राजेंद्र पितांबर कलाल यांनी दिला आहे. मात्र, आद्यप दखल घेण्यात आलेली नाही.
तक्रार विलंबित ठेवण्यामागचे कारणही सांगितले जात नाही. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.