शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादक शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:19 IST

५ पैकी ३ केंद्रांचे उद्घाटन

ठळक मुद्देभाव नसल्याने खाजगी व्यापाºयाकडे कलआॅनलाईन नोंदणीची किचकट प्रक्रियाजळगाव कृउबात उडीद-मूग खरेदी सुरू; मात्र प्रतिसाद नाही

आॅनलाईन लोकमत,जळगाव दि.२६- राज्यभरात खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पणन महासंघाकडून देखील लवकरच  जळगाव विभागात पणनकडून आठ केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ५ केंद्रांपैकी ३ केंद्रांचे उद्घाटन गुरूवार,  २६ रोजी झाले. मात्र खाजगी व्यापाºयाच्या तुलनेत कमी भाव, आॅनलाईन नोंदणीची किचकट प्रक्रिया यामुळे शेतकºयांनी ‘पणन’च्या या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जळगाव विभागात आठ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून  जिनिंग व्यावसायिकांकडून  २३ आॅक्टोबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या होत्या. जळगाव जिल्ह्यात ५ ठिकाणी केंद्र प्रस्तावित होते. त्यापैकी साकळी ता.यावल, मुक्ताईनगर या दोन केंद्रांसाठी निविदाच प्राप्त झालेल्या नाहीत. तर पारोळा, अमळनेर व धरणगाव येथील खरेदी केंद्रांसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून गुरूवार, २६ पासून खरेदी सुरू करण्यात आली. मात्र अमळनेरला केवळ ५ शेतकºयांची नोंदणी झाली असून पारोळा, धरणगाव येथे नोंदणीच झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.किचकट प्रक्रिया, भाव नसल्याने पाठ‘पणन’च्या केंद्रांवर बन्नी ब्रह्मा वाणाला ४३२० रूपये प्रति क्विंटल, एच ४एच ६ वाणाला ४२२० रूपये तर एलआर ५१६६ वाणाला ४१२० रूपये भाव जाहीर करण्यात आला आहे. त्या तुलनेत खाजगी व्यापारी सरासरी ४३०० ते ४५०० रूपये भाव देत आहेत. तसेच ‘पणन’च्या केंद्रावर कापूस देण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया शेतकºयांना किचकट वाटत असल्यानेही शेतकºयांनी या केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.सीसीआयच्या केंद्रांनाही प्रतिसाद नाहीज्या तालुक्यात पणन महासंघाचे खरेदी केंद्र नाहीत अशा तालुक्यात सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे. खान्देशात १३ केंद्र असतील. जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, जामनेर, पहूर, शेंदुर्णी, पाचोरा, बोदवड, एरंडोल, चाळीसगाव या नऊ ठिकाणी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. त्यापैकी काही केंद्र सुरू झाली आहेत. मात्र त्यासाठीही आॅनलाईन नोंदणीच असल्याने व भावही कमीच असल्याने शेतकºयांचा प्रतिसाद मिळालेला नाही.जळगाव कृउबात उडीद-मूग खरेदी सुरू; मात्र प्रतिसाद नाही नाफेडचे उडीद व मूग खरेदी केंद्र अमळनेर, चोपडा व जळगाव येथे सुरू करण्यासाठी उत्पादक शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. त्यापैकी अमळनेरला सुमारे १०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असून सोमवार, दि.२३ रोजीच केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे आतापर्यंत ८५ क्विंटल मालाची खरेदी झाली आहे. तर जळगावला गुरूवार, दि.२६ रोजी कृउबात केंद्र सुरू झाले. जळगावला बुधवारपर्यंत ६० शेतकºयांनी नोंदणी केली आहे. गुरूवारी हे केंद्र सुरू झाले. मात्र पहिल्या दिवशी नोंदणी केलेले शेतकरी फिरकलेच नाहीत. शुक्रवारी खरेदीस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कृउबातील सूत्रांनी व्यक्त केली. तर पाचोरा येथे आतापर्यंत १५-२० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. हे केंद्र एक दोन दिवसांत सुरू होणार आहे.