साकळी परिसरात कुष्ठरोग शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:36+5:302021-07-09T04:11:36+5:30
मनवेल ता. यावल : तालुक्यात १ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग ...

साकळी परिसरात कुष्ठरोग शोध मोहीम
मनवेल ता. यावल : तालुक्यात १ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संशयित रुग्णांचे मोफत निदान व उपचार केले जात आहेत. या मोहिमेचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व साकळी येथील डॉ. सागर पाटील यांनी केले.
त्वचारोग व कृष्ठरोग शोध मोहिमेत ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचे पथक प्रत्येक घरोघरी जाऊन कृष्ठरोगाबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहेत.
या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले असून ग्रामीण भागात पथकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवक घरोघरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची फिक्कट लालसर न खाजवणारा, न दुखणाऱ्या बधिर चट्ट्याची तपासणी करणार आहेत. पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवत असून बाधित रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ, संदीप पाटील, आरोग्य सेविका सविता कोळी, सविता चौधरी, गटप्रर्वतक चित्रा जावळे, लीना पाटील, आशा स्वयंसेविका रंजना कोळी, संगीता कोळी परिश्रम घेत आहेत.