रोकडे गावाजवळ बिबट्या आढळला मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 19:29 IST2019-03-11T19:27:11+5:302019-03-11T19:29:12+5:30
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळला.

रोकडे गावाजवळ बिबट्या आढळला मृतावस्थेत
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची माहिती माजी सरपंच संदीप पाटील, गोकुळ पाटील, सुनील पाटील यांनी वनविभागाला कळवली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी वनपाल देवरे, अजय महिरे यांना घटनास्थळी रवाना केले. मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे हेदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.
दरम्यान, बिबट्याच्या मृतदेहाचे मंगळवारी शवविच्छेदन केल्यानंतरही मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. हा बिबट्या नर जातीचा असल्याचे सांगण्यात आले.