मजूरावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:27 IST2021-02-06T04:27:04+5:302021-02-06T04:27:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : देव्हारी शिवारात सरपणाची लाकडे गोळा करीत असताना एका मजुरावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी ...

Leopard attack on labor | मजूरावर बिबट्याचा हल्ला

मजूरावर बिबट्याचा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : देव्हारी शिवारात सरपणाची लाकडे गोळा करीत असताना एका मजुरावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बादू भाऊसिंग भील असे या तरूणाचे नाव असून त्याच्या हाताला आणि तोंडाला जखमा झाल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दुपारी दीड वाजेच्या सुमारास बादू भील उपचारासाठी आला होता. शेतात असताना बांधावर अचानक बिबट्या आला आपल्याला पाहून तो व त्याला पाहून आपण घाबरले यात त्याने हल्ला केला. मात्र, आजुबाजूच्या मजुरांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला. असे त्याने सांगितले. यावेळी बादू याची पत्नीही सोबत होती. इरफान सालार, अकिल पिंजारी, इरफान शेख, प्रविण भोई यांनी उपचारात सहकार्य केले.

फोटो आहे

Web Title: Leopard attack on labor