जळगाव मनपा निवडणुकीतील भूमिकेमागे विधानसभेचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:38 PM2018-07-20T12:38:04+5:302018-07-20T12:39:32+5:30

मनपा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षातील नेते मंडळींकडून विधानसभेचे गणित सोडविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यादृष्टीने सोयीस्कर भूमिका घेतली जात आहे.

Legislative Assembly of Jalgaon Municipal Elections | जळगाव मनपा निवडणुकीतील भूमिकेमागे विधानसभेचे गणित

जळगाव मनपा निवडणुकीतील भूमिकेमागे विधानसभेचे गणित

Next
ठळक मुद्देप्रत्येकच नेत्याकडून सोयीने घेतली जातेय भूमिकासर्वच पक्षातील नेत्यांकडून विधानसभेचे गणित सोडविण्याचा प्रयत्नकैलास सोनवणे, ललित कोल्हे यांच्या भुमिकेकडे लक्ष

जळगाव : मनपा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षातील नेते मंडळींकडून विधानसभेचे गणित सोडविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यादृष्टीने सोयीस्कर भूमिका घेतली जात आहे.
मनपा निवडणुक जवळ आली त्याच्या आधीपासूनच अनेकांनी विधानसभेसाठी गणित आखायला सुरूवात केली होती. तर मनपा निवडणुकीत सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणात कुणी समर्थनाची तर कुणी विरोधाची भूमिका घेताना दिसले. मात्र हे करताना त्यांची भूमिका ही निव्वळ विधानसभेचे गणित सोडविण्यासाठीचे प्रयत्न असल्याचे लपून राहू शकलेले नाही.
माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तर आमदारकीसाठी गेल्या वर्षभरापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच त्यांनी भाजपात जाण्याची तयारीही केली होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेले सख्य त्यांचा याबाबतचा ‘प्लस पॉर्इंट’. मनपा निवडणुकीत आधी भाजपाची शिवसेनेशी युती होत असल्याच्या चर्चेमुळे स्वतंत्र आघाडी उतरविण्याची घोषणा केली. मात्र युती होत नसल्याचे लक्षात येताच भाजपात प्रवेश केला.
तर महापौर ललित कोल्हे यांनी यापूर्वीही २००९ मध्ये जळगाव ग्रामीणमधून तर २०१४ मध्ये जळगाव शहर मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली आहे. मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर ते मनपात सुरेशदादा जैन यांच्या खाविआसोबत आल्याने त्यांना महापौरपदाची संधी देण्यात आली.
तसेच शिवसेनेकडून विधानसभेचे उमेदवार अशीही ओळख पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे करून दिली जात होती. मात्र भाजपाकडून जळगाव ग्रामीण अथवा विधानपरिषद असे आश्वासन मिळाल्याने त्यांनी मनपा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात प्रवेश केला आहे.

Web Title: Legislative Assembly of Jalgaon Municipal Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.