Leave Chalisgaon on the train | चाळीसगावला सोडा हातगाड्यांवर
चाळीसगावला सोडा हातगाड्यांवर

ठळक मुद्देमद्य विक्रीचा प्रकारनागरिकांमध्ये संतापपोलिसांनी कारवाई करण्याची मागणी

चाळीसगाव, जि.जळगाव : शहर परिसरात असणाऱ्या सोडा विक्री करणाºया हातगाड्यांवर मद्य विक्रीही केली जात असल्याने तळीरामांचा रहिवाशांसह पादचाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारुन अवैध मद्य विक्री बंद करण्याची संतप्त मागणी आहे.
शहर परिसरात बस स्थानकाच्या मागील बाजूस हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिसरातील रहिवाशांनाही आता याचा त्रास होऊ लागला आहे. या भागात लक्ष्मी नगरसह मोठी रुग्णालये असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. महिला व मुलींसाठी हा रस्ताच सुरक्षित नसल्याचीही तक्रार आहे. मद्यपी हातगाड्यांभोवती गोळा होऊन हातवारे करतात. यामुळे परिसरातील नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे.
बसस्थानक प्रवेशव्दार, धुळे रोड कॉर्नर, शासकीय विश्रामगृहाजवळील स्टेशन रोड लगत आणि दूध सागर मार्गालगतही सोडा गाड्यांवर छुप्या पद्धतीने मद्य विक्री होत असल्याची ओरड आहे. डोळ्यांच्या धर्मार्थ दवाखान्याच्या परिसरात नागरी वस्तीला लागूनही सोडा गाड्यांवर सायंकाळी तळीरामांचे 'चिअर्स' सुरू असते. यामुळे पादचारी महिलांना त्रास होतो. नागरिकही वेठीला धरले जात असल्याचा संतप्त सूर आहे.
दारुबंदी उत्पादन शुल्क कार्यालय अधून-मधूनच उघडे असल्याने तक्रार कुठे करायची? असाही रोष रहिवासी व्यक्त करतात. त्यामुळे पोलिसांनीच 'दंडुका' बाहेर काढावा, अशी नागरिकांची रास्त मागणी आहे.

Web Title:  Leave Chalisgaon on the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.