लोकमत आॅनलाईनमुंगसे , ता अमळनेर ' दि .९ : अमळनेर - चोपडा रस्त्यावरील दहिवद फाट्याजवळ उपखेड ता. चाळीसगाव येथून चहार्डी ता. चोपडा येथे लग्नकार्यासाठी जाणारी मिनीट्रक उलटून त्यात ११ वºहाडी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. जखमीत दोन बालकांचा समावेश आहे.उपखेड ता. चाळीसगाव येथून अमळनेरमार्गे चहार्डी येथे लग्नासाठी जाणारी मालवाहू गाडी (क्रमांक- एम.एच. १०, झेड ५४३९) ही शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चोपडा रोडवरील दहिवद फाट्याजवळ उलटली. त्यात ११ जण जखमी झाले असून जखमींमध्ये महिलांसह दोन बालकांचा समावेश आहे. जखमींमध्ये लताबाई राजेंद्र पाटील (४०) ,संजय तुळशीराम पाटील (३५), संदीप बाळासाहेब मगर (२५),हर्षल अरुण मगर(२१) उज्वला सुरेश कापडणे (२९) ,रेखा संदीप मोरे (२६),अश्विनी राजेंद्र पाटील (२३), भारती रविंद्र पाटील (२४), रोहिणी रविंद्र पाटील (४), मोनी कैलास पाटील (१०) सर्व रा. उपखेड, तसेच मिनाबाई निंबा पाटील (६०, रा विंचूर) यांचा समावेश असून त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उपखेड येथील संजय गंभीर मगर यांच्या मुलीचे लग्न चहार्डी येथील नवरदेव मुलाकडे होते .वºहाडींचा ट्रकला अपघात झाल्याची बातमी नवरदेवाच्या घरी पोहचताच एकच धावपळ उडाली. चहार्डी येथून दोन वाहने मागवून घटनास्थळावरून इतर वºहाडी मंडळीना नेण्यात आले.दरम्यान, घटनास्थळी सा.बां. विभाग कर्मचारी राजेंद्र पाटील दहिवद, भटू पाटील, मुंगसे आणि इतर प्रवाशांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
अमळनेरजवळ लग्न वºहाडाचे वाहन उलटून ११ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 17:01 IST
अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी लग्न वºहाडाचे वाहन उलटून त्यात दोन बालकांसह ११ जण जखमी झाले. जखमी काही महिलांचा समावेश असून त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमळनेरजवळ लग्न वºहाडाचे वाहन उलटून ११ जण जखमी
ठळक मुद्देअमळनेर- चोपडा रस्त्यावर घडला अपघात उपखेड ता. चाळीसगाव येथील होते वºहाडी चहार्डी ता. चोपडा येथे जात होते लग्नाला