Launching at Amoda | आमोदा येथे हाणामारी
आमोदा येथे हाणामारी


फैजपूर : आमोदा, ता. यावल येथे हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात एक जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून फैजपूर पोलिसात १४ आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. बुधवारी रात्री आरोपी यांनी लाठ्या व आसारीने मारहाण करीत दगडफेक केली तसेच शिवागाळ करून भूषण आनंदा तायडे याच्या पोटावर हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. याबाबत अक्षय यशवंत तायडे याने तक्रार दिल्यावरून विकास विश्वनाथ शिंदे, ईश्वर हरी सपकाळे, तुषार संतोष कठोरे, लोकेश अरुण सपकाळे, हेमंत सुभाष सपकाळे, उमेश सपकाळे सर्व रा आमोदा यांच्या विरुध्द दंगलीचा व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटातर्फे विश्वनाथ आनंदा शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सतिष तायडे, राहुल तायडे, दीपक लहू तायडे, शुभम आनंदा तायडे, राधे तायडे, भूषण आनंदा तायडे, आनंदा तायडे, अक्षय यशवंत तायडे सर्व रा. आमोदा यांच्या विरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या हाणामारीत भूषण आनंदा तायडे हा जखमी झालेला आहे. यावेळी ईश्वर हरी सपकाळे यांची मोटारसायकल (एम एच १९ -सी एन ४४०७) पेटवून देण्यात आली. विकास शिंदे, ईश्वर सपकाळे, तुषार कठोरे, उमेश सपकाळे यांना अटक केली असून बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Launching at Amoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.