पहूर येथील लसीकरण महोत्सवाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:31+5:302021-09-05T04:20:31+5:30
दोन्ही केंद्रावर १ हजार ९०० लाभार्थ्यांचे जम्बो लसीकरण करण्यात आले. पेठ ग्रुप ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायत तसेच माजी ...

पहूर येथील लसीकरण महोत्सवाचा शुभारंभ
दोन्ही केंद्रावर १ हजार ९०० लाभार्थ्यांचे जम्बो लसीकरण करण्यात आले.
पेठ ग्रुप ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायत तसेच माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या सहकार्याने दोन हजार डोस वितरण महोत्सव आयोजित करण्यात आला. कसबे माळी समाज मंगल कार्यातील लसीकरण केंद्रावर तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन नोंदणी करताना नागरिकांना अडचणी येत असल्याने किरकोळ गोंधळ उडाला.
यादरम्यान आमदार गिरीश महाजन यांनी लसीकरण मोहिमेबाबत सूचना करून आरोग्यदूत अरविंद देशमुख यांच्या समन्वयातून लसीकरण पुढे सुरळीत करण्यात आले. मोहिमेचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांला मिळावा, यासाठी नियोजन करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उशिरापर्यंत नोंदणी सुरू ठेवली. येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांचे यशस्वी लसीकरण उशिरापर्यंत सुरू होते. पेठ लसीकरण केंद्रावर पेठ ग्रामपंचायतीने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक आमदार गिरीश महाजन यांनी शुभारंभप्रसंगी केले.
उशिरापर्यंत १ हजार ९०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. पेठ व कसबे लसीकरण केंद्रावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोणवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, जि.प. सदस्य अमित देशमुख, आरोग्यदूत अरंविद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, अधिपरिचारक ऋषिकेश भालेराव, भूषण वाघ, उपसरपंच श्यामराव सावळे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख रामेश्वर पाटील, उपसरपंच राजू जाधव, माजी सरपंच शंकर जाधव, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, माजी उपसरपंच योगेश भडांगे, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, शेंदुर्णी जिनिंग संचालक अरूण घोलप, विकासो चेअरमन किरण खैरनार, समाधान पाटील, ललित लोढा, वासुदेव घोंगडे, संदीप बेढे, चेतन रोकडे, महेश पाटील, ईश्वर देशमुख, अक्षय पाटील, सोनू बाविस्कर, गणेश जाधव, दिलीप बाविस्कर, रवींद्र मोरे, विनोद थोरात, दिनकर पवार, शिवाजी राऊत, गजानन देशमुख, ईश्वर बारी यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
कॅप्शन पहूर पेठ येथील लसीकरण केंद्रावर शुभारंभ दरम्यान गिरीश महाजन यांनी पाहणी करून रामेश्वर पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेताना. दुसऱ्या छायाचित्रात कसबे लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी उडालेली झुंबड. यात नियोजन करताना राजू जाधव, लक्ष्मण गोरे व विनोद थोरात.
040921\04jal_14_04092021_12.jpg
कसबे लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी उडालेली झुंबड.