दहीवद येथे आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:23+5:302021-09-02T04:36:23+5:30
यावेळी त अनिल भाईदास पाटील यांनी तालुक्यातील आदिवासींना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती दिली. तसेच प्रतिभा शिंदे ...

दहीवद येथे आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ
यावेळी त अनिल भाईदास पाटील यांनी तालुक्यातील आदिवासींना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती दिली. तसेच प्रतिभा शिंदे यांनी २०१४ पासून बंद असलेली खावटी कर्ज योजना ही २२ व २३ नोव्हेंबर २०१८ च्या लोक संघर्ष मोर्चाच्या उलगुलान मोर्चात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहेत त्या प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व आदिवासींचेही प्रत्येकी २३०० रु. खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी योजना मिळावी यासाठी आग्रह धरला होता व खावटी कर्जमाफीचे लेखी पत्र त्याच दिवशी घेतले होते, लोक संघर्ष मोर्चाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आज मिळालेल्या योजनेचे समाधान व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. व आदिवासी लाभार्थ्यांना योजनेकरिता महत्त्वाचे असलेले रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मेळावे चालू आहेत वंचित लाभार्थ्यांना विनामूल्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. यासह आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक व विविध योजनांची ही माहिती दिली. कार्यक्रमास पं.स. सदस्य विनोद जाधव, प्रवीण पाटील, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, कृ.उ.बा. समितीचे प्रशासक एल. टी. पाटील, संदीप घोरपडे, नगरसेविका राधाबाई पवार, भाईदास भिल, नगावचे सरपंच महेश पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे संजय पवार विजय पूनमचंद पारधी, समाधान पारधी, बालिक पवार, ढेकूचे रावसाहेब पवार, अमळगावचे मिलिंद पाटील, बन्सीलाल पारधी, दापोरीचे हिरालाल महाराज, एकलव्य सेनेचे राज साळवी, टाकरखेडाचे ज्ञानेश्वर पाटील, दहीवदच्या सरपंच नंदाबाई मावळे, ग्रा.पं. सदस्या हिराबाई भिल, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सीमा पारधी, मुकेश पारधी, ज्ञानेश्वर देसले, प्रशांत सोनवणे, अजय पारधी, शिवाजी पारधी, सुनील चव्हाण यांच्यासह शेकडो आदिवासी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते. माळी यांनी विनामूल्य सेवा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारेला, सूत्रसंचालन व्ही. आर. पाटील, लाभार्थींना किट वाटपाचे नियोजन शिरसाठ, वैशाली पाटील, चारूशीला महाजन यांनी केले तर आभार गणेश तांदळे यांनी मानले.