पाईप लाईन गळतीमुळे जळगाव शहरात उशिराने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 08:52 PM2018-02-17T20:52:34+5:302018-02-17T20:54:26+5:30

वाघूर पंपींग वरील पंप बंद व मेहरूणमधील पाईप लाईनची गळती यामुळे शहरात बºयाच भागात शनिवारी पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने झाला. यामुळे नागरिकांचे हाल झाले.

Late water supply to Jalgaon city due to pipe line leak | पाईप लाईन गळतीमुळे जळगाव शहरात उशिराने पाणी पुरवठा

पाईप लाईन गळतीमुळे जळगाव शहरात उशिराने पाणी पुरवठा

Next
ठळक मुद्देसिंधी कॉलनी व परिसरातील उपनगरे, समता नगर, जुनेगावाचा काही भागात, नित्यानंद नगरकडील काही भाग, महाबळ परिसरातील पूर्वेकडील कॉलन्यांचा भागात उशिराने पाणी पुरवठासुप्रीम कॉलनीतील अर्ध्या भागात उशिराने व तर अर्ध्या भागात पाणी पुरवठा नाहीमेहरूण भागात मुख्य रस्त्यावरील पाईप लाईनला गळती

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१७ : वाघूर पंपींग वरील पंप बंद व मेहरूणमधील पाईप लाईनची गळती यामुळे शहरात बºयाच भागात शनिवारी पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने झाला. यामुळे नागरिकांचे हाल झाले. रविवारी मात्र पाणी पुरवठा सुरळीत होईल असे सूत्रांनी सांगितले.
वाघूर पपींगवर एका पंपात बिघाड झाली होती. त्याच्या दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत चारही पंप बंद होते. या ठिकाणी पंप दुरूस्तीची काम मनपा पाणी पुरवठा विभागाने युद्ध पातळीवर पूर्ण करून पंप सुरू केला.
मेहरूणमध्ये गळती
मेहरूण भागात मुख्य रस्त्यावर भारूका किराणा दुकानाजवळ गेल्याच आठवड्यात गळतीची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र एक गळती त्यावेळी सापडली नव्हती. त्यामुळे या ठिकाणी पाणी गळती सुरूच होती. या गळतीवर सकाळपासून काम सुरू होते. तेदेखील पूर्ण करण्यात आले.
पाणी पुरवठा विस्कळीत
वाघुर पपींग वरील दुरूस्ती व मेहरूणमधील गळती थांबविणे या कामामुळे टाक्या भरण्यास उशिर झाला होता. त्यामुळे शहरातील सिंधी कॉलनी व परिसरातील उपनगरे, समता नगर, जुनेगावाचा काही भागात, नित्यानंद नगरकडील काही भाग, महाबळ परिसरातील पूर्वेकडील कॉलन्यांचा भागात उशिराने पाणी पुरवठा झाला. तर सुप्रीम कॉलनीतील अर्ध्या भागात उशिराने व तर अर्ध्या बागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू होती.

Web Title: Late water supply to Jalgaon city due to pipe line leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.