भाजपाने स्व. राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:10+5:302021-06-16T04:23:10+5:30

पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांनी अभियंता धामोरे यांच्यावर अविश्वास व्यक्त करत प्रसिद्धी पत्रक काढत ...

The late BJP. The politics of Rane's death should be stopped | भाजपाने स्व. राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे

भाजपाने स्व. राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे

पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांनी अभियंता धामोरे यांच्यावर अविश्वास व्यक्त करत प्रसिद्धी पत्रक काढत सत्यघटना कथन केली आहे. त्यानुसार सोमवार दि. ०७ जून रोजी शिवसेनेने पाचोरा विभागातील सर्व कार्यालयांना व उपकेंद्रांना टाळा ठोको आंदोलन केले. हे आंदोलन शांततेत समाप्त झाल्यानंतर म्हणजे सुमारे १२:४५ वाजता काही अज्ञात लोकांनी उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली व उपकार्यकारी अभियंता यांना मारहाण केली, इतपत हे सत्य आहे. परंतु राणे हे भांडणे सोडविण्यासाठी गेले व त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला, हे साफ चुकीचे व खोटे आहे, असे बारावकर यांनी म्हटले आहे.

सत्य परिस्थिती अशी आहे की, उपकार्यकारी अभियंता यांना मारहाण झाली तेव्हा राणे हे काही सहकाऱ्यांसोबत उपविभागात होते. अज्ञात मारेकरी हे जेव्हा बाहेर आले, तेव्हा उपकार्यकारी अभियंता धामोरे हे मारेकऱ्यांचा पाठलाग करत होते. त्यांच्यामागे उपविभागातील काही कर्मचारीही होते व त्यामध्ये राणे पण होते. मारेकरी फरार झाल्यानंतर राणेंची तब्येत बिघडली व शवविच्छेदन रिपोर्टमध्ये राणेंना हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला आहे, असे निर्देशित केले आहे. अभियंता संघटनेने आपल्या चारही संघटनांची दिशाभूल करून आपला पाठिंबा मिळवून दि. ८ जून रोजी गेटमीटिंग करून घेतली व तेथे भासविण्यात आले की, राणेंचा मृत्यू हा हाणामारीत झाला आहे व तशी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली. याबाबतची सत्यता भडगाव उपविभागातील कर्मचाऱ्यांना माहीत आहे, असे बारावकर यांनी म्हटले आहे.

खोटी तक्रार दाखल केल्यामुळे ग्राहकांचा व शिवसेनेचा आपल्या कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे व कर्मचारी हे दहशतीत व भांबावलेले आहेत तरी आपण चारही संघटनांच्या पाचोरा व जळगाव झोनच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक करून सत्य कहाणी ही समाजमाध्यमांना देऊन आमचा चारही संघटनेच्या सभासदांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असे निर्देशित केले आहे. तेव्हाच आपल्या सभासंदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल, अशी भूमिका घेतली आहे.

अमोल शिंदे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये भागीदारी करत कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये जनतेची लूट केली आहे. त्यामुळे त्यांना जनतेचा किती कळवळा आहे, हे सर्वांना कळते. भोळ्याभाबड्या भडगावकरांची दिशाभूल करू नये, असा इशाराही या पत्रकात शेवटी दिला आहे. या पत्रकावर शेतकी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, पाचोरा तालुकाप्रमुख शरद पाटील यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर यांच्या सह्या आहेत.

Web Title: The late BJP. The politics of Rane's death should be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.