‘मला जगायचं नाही हा शेवटचा फोन’ बोरखेडा, ता धरणगाव येथे आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याचा फोन; नातेवाइकांचे वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न असफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:29+5:302021-09-02T04:38:29+5:30

बोरखेडा येथील शेतकऱ्याचा आत्महत्यापूर्वी फोन फोटो धरणगाव : मला जगायचं नाही.... माझा हा शेवटचा फोन.. असा फोन करीत बोरखेडा, ...

‘This is the last phone call I don't want to live’ A farmer's phone call before committing suicide at Borkheda, Ta Dharangaon; Betting attempts to save relatives fail | ‘मला जगायचं नाही हा शेवटचा फोन’ बोरखेडा, ता धरणगाव येथे आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याचा फोन; नातेवाइकांचे वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न असफल

‘मला जगायचं नाही हा शेवटचा फोन’ बोरखेडा, ता धरणगाव येथे आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याचा फोन; नातेवाइकांचे वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न असफल

बोरखेडा येथील शेतकऱ्याचा आत्महत्यापूर्वी फोन

फोटो

धरणगाव : मला जगायचं नाही.... माझा हा शेवटचा फोन.. असा फोन करीत बोरखेडा, ता. धरणगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथील शेतकऱ्यानेही आपली जीवनयात्रा संपविली.

कैलास धनसिंग पाटील (५५, रा. बोरखेडा, ता. धरणगाव ) व विलास ओंकार डांबरे (३५, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) अशी या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

कैलास पाटील यांच्यावर ७ लाखांचे कर्ज होते. मंगळवारी त्यांनी नातेवाइकांसह पत्नी, मुलं, यांच्याशी माझा शेवटचा फोन असल्याचे सांगत संवाद साधला. नंतर सायंकाळी त्यांनी शेतात जाऊन गळफास घेतली. दहा वर्षांपूर्वीही त्यांच्या भावाने आत्महत्या केली होती.

सततच्या कर्जबाजारीपणामुळे तसेच दरवर्षी उत्पादन घटत असल्याने, विलास डांबरे यांनी राहत्या घराच विष घेतले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्यावर खासगी फायनान्स व बँकेचे कर्ज होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने बुधवारी गावात एकाचीही चूल पेटली नाही. पाचोरा पोलीस स्टेशनचे हवलदार हंसराज मोरे यांनी पंचनामा केला.

कैलास धनसिंग पाटील वय 55

Web Title: ‘This is the last phone call I don't want to live’ A farmer's phone call before committing suicide at Borkheda, Ta Dharangaon; Betting attempts to save relatives fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.