धगधगत्या काश्मीर खोºयात रुग्णसेवा
By Admin | Updated: May 25, 2017 00:50 IST2017-05-25T00:50:11+5:302017-05-25T00:50:11+5:30
जळगावातील डॉक्टरांकडून ३७०० जणांवर उपचार : मोर्चा काढून शिबिराला झाला विरोध

धगधगत्या काश्मीर खोºयात रुग्णसेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जम्मू-काश्मीर सारख्या अतिसंवेदनशील, नेहमीच अतिरेकी हल्ले, गोळीबार, सतत दहशतीचे वातावरण, अतिरेकी कारवाया याची तमा न बाळगता तेथील जनतेच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि त्यांना आपलेसे करावे, या हेतूने जळगाव, नाशिक येथील डॉक्टरांनी १० ते २० मे या काळात काश्मीरमधील सीमारेषेवर मोफत आरोग्य सेवा केली. विशेष म्हणजे या आरोग्य शिबिराला कट्टकपंथीयांचा विरोध, मोर्चे काढून तपासणी रोखण्याचा प्रयत्न होऊनही हे डॉक्टर मागे हटले नाही.
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संस्थापक अदिक कदम यांच्यासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून जुळलेले व या संस्थेचे समन्वयक, जळगावातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावातीलच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.जितेंद्र मोरे, नाशिकचे डॉ. मधुकर आचार्य, डॉ.रामदास भोई, डॉ.शेखर मगर, डॉ. सुदेश बोरा, डॉ.सचिन भांबेरे व व्यवस्थापक ऋषिकेश परमार यांनी सदरील काळात काश्मीर खोºयात आरोग्यसेवा दिली.
कट्टरपंथीयांचा विरोध
त्रेहगाम येथे काही कट्टरपंथीयांचा विरोधही झाला, मात्र याला न जुमानता तेथील डॉक्टर्स व कर्मचारी यांनी सदरील शिबिरासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या चमुला आधार दिला तसेच भारतीय सैन्यदेखील दवाखान्यात हजर झाले. बिरवाह येथे आरोग्य शिबिर सुरू असताना मोठा निषेध मोर्चा निघाला तेव्हा स्थानिक जनता व रुग्णांनी डॉक्टरांच्या या चमुला वेढा घातला व संरक्षण देऊन शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले. या शिबिरादरम्यान सुमारे ३७०० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन प्राथमोपचार करण्यात आले.
भविष्यात फाउंडेशनतर्फे जम्मू येथे अनाथालय व शाळेसाठी जागा घेण्यात येणार आहे. काश्मीर हे केवळ सैनिक व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी नसून आपलीदेखील जबाबदारी आहे या विचाराने आम्ही हे कार्य करीत आहोत.
-डॉ. धर्मेंद्र पाटील, समन्वयक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन