शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील ओझरखेडा तलावात झाला मोठा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:07 IST

भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या ओझरखेडा तलावात यंदा हतनूर धरणाच्या पुराचे पाणी सोडल्याने यंदा प्रथमच २८ दशलक्ष घनमीटर पाणी साचल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देया तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मातीचे धरण आहे.भविष्यातील एकूण पाणीसाठा ८५ .६७८ द.ल .घ.मी. एवढा असून, जिवंत जलसाठा ७९.२३ द.ल.घ.मी.एवढा आहे. तलावाची संचयन पातळी २८० मीटर आहे. त्यामुळे १६,९४८ हेक्टर शेतीला लाभ होईल.

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या ओझरखेडा तलावात यंदा हतनूर धरणाच्या पुराचे पाणी सोडल्याने यंदा प्रथमच २८ दशलक्ष घनमीटर पाणी साचल्याने समाधान व्यक्त होत आहे. लांबवर का होईना वन्यजीव प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.बहुप्रतीक्षेनंतर यंदा २५ टक्के हतनूर धरणातील जुलै, आॅगस्टमधील काही क्षमतेने पुराचे पाणी उचलून तलावात टाकण्यात आले. त्याचे संमाधान व शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. नुकतीच शासकीय स्तरावर पहाणी करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव-तळवेल परिसर सिंचन योजना या नावाने हा प्रकल्प आहे.नैसर्गिक पावसाने पाच ते सात टक्के जलसाठा येथे उन्हाळ्यात शिल्लक राहात असे. यंदा प्रथमच त्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. दरवर्षी अल्प साठा असताना या तलावाच्या कामाला दोन दशके पूर्ण झाले होते. यंदाही तलावात पाणी पडेल किंवा नाही याची शेतकºयांना शंका होती. त्यातच यंदा कमी पावसामुळे तलावात पाणी साचने कठीण होते. तलावात पाणी पडल्याचे समाधान व्यक्त होत आहे. परिसरातील कूपनलिका व विहिरींनाही जल श्रोत वाढीसाठी महत्त्वाचे आहे. तलावाचे कामे सुरू आहे.यंदा २८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. दरवर्षी २५ टक्के धरणाचे पाणी तलावात साठवले जाणार आहे. इतर कामे प्रगती पथावर आहेत. पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी प्रस्तावित आहे. पूर्ण क्षमतेने तलाव भरल्यास १६,९४८ हेक्टर जमिनीला फायदा होईल.-मनोज ढोकचौळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग 

टॅग्स :WaterपाणीMuktainagarमुक्ताईनगर