एरंडोल तालुक्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:33+5:302021-06-19T04:11:33+5:30
या तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गांजा तस्करीबाबत नेहमी चर्चा होत होती, तालुक्यातील एका अत्यंत लहान खेड्यातून ह्या ...

एरंडोल तालुक्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट
या तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गांजा तस्करीबाबत नेहमी चर्चा होत होती, तालुक्यातील एका अत्यंत लहान खेड्यातून ह्या व्यवसायाचे सूत्र हलतात,पण हे लोक स्थानिक पातळीवर हा व्यवसाय करीत नसल्याने पोलिसांना ही माहिती असल्यावरदेखील काही कारवाई करता येत नव्हती, पण आता तालुक्यातील हे आरोपी ओरिसा राज्यात सापडल्याने या आरोपींकडून अधिकची माहिती मिळेल, अनेक नावे समोर येतील, अशादेखील चर्चा सुरू झाल्या आहेत.
ओरिसा राज्यातील व स्थानिक भाषेतील समाचार चॅनलला ८जून रोजीच्या बातमीत जयपूरे ( जि.कोरापूत ओरिसा राज्यातील या गावात एका ट्रकमधून दहा क्विंटल वजनाचा गांजा स्थानिक पोलिसांनी पकडला आहे, त्याची बाजारात एक कोटी दहा लाख रुपये किंमत सांगण्यात येत आहे. या बातमीत महाराष्ट्रातील दोन आरोपी पकडल्याची माहिती देण्यात येत असून पोलिसांसह हे दोन्ही आरोपी ट्रक व गांजाच्या पोत्यासह दाखवण्यात येत आहेत, या टीव्हीच्या समाचारातील व्हिडिओत दाखवले जाणारे आरोपी या तालुक्यांतील लोकांनी ओळखले असून त्यातला एक पोलीस पाटील असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित पोलीस पाटील गेल्या ८/१०दिवसांपासून गावात नसल्याची माहिती मिळाली आहे.
या गोरख धंद्यात अफाट पैसा मिळत असल्याने अनेक गावातील अनेक तरुण या रॅकेटमध्ये सामील असल्याची मोठी चर्चा आता होत आहे.
-----
ही माहिती आम्हाला मिळाली आहे, शंका होतीच,पण अधिकृत माहिती संबंधित पोलिसांकडून लवकरच प्राप्त होईल, त्यानंतर कारवाई करता येईल, संबंधित पोलीस पाटीलला याबाबत काही दिवसांपूर्वी बोलावून माहिती घेण्याचा प्रयत्नदेखील केला होता, आता प्रांताधिकारी व वरिष्ठांना ह्याबद्दल अहवाल पाठविण्यात येणार आहे.-- रवींद्र जाधव,सपोनि. पोलीस ठाणे कासोदा
===Photopath===
180621\img-20210618-wa0169.jpg
===Caption===
दहा क्विंटल गांजाच्या पोत्यांसह आरोपी