खडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच भलामोठा खड्डा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:37+5:302021-09-08T04:22:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खडकदेवळा, ता. पाचोरा : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच प्रकल्प पाहण्यासाठी ...

खडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच भलामोठा खड्डा..
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकदेवळा, ता. पाचोरा : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच प्रकल्प पाहण्यासाठी चढताना या रस्त्यावरून जाताना भलामोठा खड्डा पडला आहे. यामुळे हा भलामोठा खड्डा अत्यंत धोकादायक झाला आहे.
हा खड्डा जणू वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत असून, संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने याठिकाणी रस्त्याला लागूनच भलामोठा असा मोठा खड्डा पडला असून, अद्याप हा खड्डा दुरुस्त न केल्याने वाहनधारकांसाठी तो जीवघेणा बनला आहे. हा खड्डा भिंतीजवळ हिवरा माध्यम प्रकल्पाच्या असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तरी संबंधित विभागाकडे हा खड्डा दुरुस्त करण्याची मागणी खडकदेवळा येथील युवा नेते बापू बालू पाटील यांनी केली आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नाइलाजाने ग्रामस्थ व पर्यटक याच खड्ड्याजवळून जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.
070921\img_20210903_150540.jpg~070921\07jal_13_07092021_12.jpg
???????? ????? ?????? ???????????? ??????? ???????? ? ??????? ?????..*
*??????????? ?????????? ??? ??????? ?? ????? ?????? ???????????? ??????? ????????? ????...*
~खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच पावसाने पडलेला भलामोठा खड्डा. (छाया : आत्माराम गायकवाड)