खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळ भलामोठा खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:56+5:302021-09-04T04:20:56+5:30

आत्माराम गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क खडकदेवळा ( वार्ताहर ) ता.पाचोरा : पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या खडकदेवळा येथील हिवरा माध्यम ...

A large pit near the protection wall of Khadakdevala Hiwara Media Project | खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळ भलामोठा खड्डा

खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळ भलामोठा खड्डा

आत्माराम गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क

खडकदेवळा ( वार्ताहर ) ता.पाचोरा : पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या खडकदेवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच प्रकल्प पाहण्यासाठी चढताना या रस्त्यावरून जाताना भलामोठा खड्डा पडला आहे.

यामुळे हा भलामोठा खड्डा अत्यंत धोकादायक झाला आहे. हा खड्डा जणू वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत असून संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने याठिकाणी रस्त्याला लागूनच भलामोठा असा खड्डा पडला असून अद्याप हा खड्डा दुरुस्त न केल्याने वाहनधारकांसाठी तो जीवघेणा बनला आहे. तसेच हा खड्डा भिंतीजवळ हिवरा माध्यम प्रकल्पाच्या असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो.तरी संबंधित विभागाकडे हा खड्डा दुरुस्त करण्याची मागणी खडकदेवळा येथील युवा नेते बापू बालू पाटील यांनी केली आहे.मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नाइलाजाने ग्रामस्थ व पर्यटक याच खड्ड्याजवळून जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.

----

*फोटो कॅप्शन्स= खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळच पावसामुळे पडलेला भलामोठा खड्डा हा येणाऱ्या पर्यटकांना व प्रकल्पालाच धोकादायक स्थिती दर्शवित आहे. (छायाचित्र : आत्माराम गायकवाड)

030921\img_20210903_150540.jpg

खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीजवळ च भलामोठा खड्डा..*

*खड्डयांमुळे पर्यटकांचा जिव धोक्यात तर हिवरा माध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीलाही धोका...

Web Title: A large pit near the protection wall of Khadakdevala Hiwara Media Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.