वाढीव वीजबिलविरोधात शासनाला कंदील भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:43+5:302021-07-15T04:12:43+5:30
चोपडा : बहुजन मुक्ती पार्टीतर्फे शासनाला वाढत्या वीजबिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अनिल गावित यांच्यामार्फत ...

वाढीव वीजबिलविरोधात शासनाला कंदील भेट
चोपडा : बहुजन मुक्ती पार्टीतर्फे शासनाला वाढत्या वीजबिलाच्या विरोधात सरकारला कंदील भेट आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अनिल गावित यांच्यामार्फत कंदील व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनातून प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे केल्या आहेत... २०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, मीटर भाडेकपात करण्यात यावी, विजेचा स्थिर आकार वर प्राथमिक भावाप्रमाणे दरआकारणी करावी, सक्तीची वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी, ज्या ग्राहकांनी वीजबिल मार्च २०२०पासून भरले त्यांच्यासाठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीजबिल निल पाठवावे, ३० दिवसांनंतर रीडिंग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. यावेळी रवींद्र आधार वाडे(जळगांव लोकसभा प्रभारी बहुजन मुक्ति पार्टी), सय्यद असद अली असगर अली (बहुजन क्रांती मोर्चा चोपडा अध्यक्ष), भारती रवींद्र वाडे (जळगांव जिल्हा संघटक, बहुजन मुक्ती पार्टी), आधार करंदीकर (उपाध्यक्ष, बुध्दिष्ट इनटरनॅशनल नेटवर्क), गेमा शंकर बारेला (बहुजन क्रांती मोर्चा सदस्य), नजीर काजी (बहुजन मुक्ती पार्टी सदस्य), मुबारीक कुरेशी (बहुजन मुक्ती पार्टी सदस्य), सुनील भीमराव केदार (बहुजन मुक्ती पार्टी सदस्य) उपस्थित होते.
१५सीडीजे ४ (फोटो)