घरमालकाची भाडेकरूंना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:16 IST2021-03-06T04:16:18+5:302021-03-06T04:16:18+5:30

जळगाव : घरात येऊ देणार नाही, म्हणत घर मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी भाडेकरू दांपत्यासह त्यांच्या मुलास शिवीगाळ करून मारहाण केल्याची ...

The landlord beats the tenants | घरमालकाची भाडेकरूंना मारहाण

घरमालकाची भाडेकरूंना मारहाण

जळगाव : घरात येऊ देणार नाही, म्हणत घर मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी भाडेकरू दांपत्यासह त्यांच्या मुलास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता मोहन नगरात घडली. याप्रकरणी रमेश पाटील यांच्यासह दोघांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील नारायण शिंदे हे पत्नी रजनीबाई व मुलगा परेश यांच्यासह मोहन नगरातील रमेश पाटील यांच्या मालकीच्या घरात भाडेतत्वावर राहतात. गुरुवारी रात्री सुनील हे पत्नी व मुलासह घराच्या कंपाउंडमध्ये आल्यावर त्यांना घरमालक रमेश पाटील यांनी तेथेच रोखले व घरात येऊ देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. यावरून घरमालक व भाडेकरू यांच्यात वाद उफाळला. त्यात रमेश पाटील यांनी शिंदे यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर पाटील यांच्या कुटुंबीयांनीही रजनीबाई व त्यांच्या मुलाला मारहाण केली. अखेर याप्रकरणी रजनीबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The landlord beats the tenants