जामनेरात जमीन घेतली, पण लिलावात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:42+5:302020-12-04T04:46:42+5:30

जळगाव : जामनेर तालुक्यात आपण जमीन घेतली आहे, परंतु ती लिलावात घेतली आहे. त्याचा बीएचआर प्रकरणाशी संबंध जोडणे चुकीचे ...

Land acquired in Jamnera, but not in auction | जामनेरात जमीन घेतली, पण लिलावात नाही

जामनेरात जमीन घेतली, पण लिलावात नाही

जळगाव : जामनेर तालुक्यात आपण जमीन घेतली आहे, परंतु ती लिलावात घेतली आहे. त्याचा बीएचआर प्रकरणाशी संबंध जोडणे चुकीचे असून त्याच्याशी आपला संबंध नाही. पोलीस चौकशीत सत्य काय ते उघड होईलच, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणात महाजन यांनी जामनेर तालुक्यात फत्तेपूर, शहापूर रस्त्यावर सहा एकर शेतजमीन घेतली व त्याच्या खाते उताऱ्यावर गिरीश महाजन, पत्नी साधना महाजन यांची नावे आहेत. तसेच नातेवाईक व कार्यकर्त्यांच्या नावे कवडीमोल भावात शेत जमीन घेतल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष ललवाणी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला होता.

पुणे येथील उद्योजकाने साडेतीन वर्षापूर्वी ही जमीन खरेदी केली होती. आता चार महिन्यापूर्वी कोरोनाच्या महामारीत आर्थिक अडचण आल्याने त्यांनी ही जमीन विक्रीस काढली व ती आपण खरेदी केलेली आहे. स्वत: तसेच पत्नीच्या नावावर ही जमीन आहे. व्यवहार झाल्यानंतर ज्याच्याकडून जमीन घेतली, त्यांना बँकेतून धनादेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सारा व्यवहार कायदेशीर आहे, यात गैरव्यवहाराचा संबंधच नाही? असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

............

बीएचआरशी संबंधच नाही

बीएचआर प्रकरणात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार व एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात धाडसत्र राबविले. त्यात गिरीश महाजन समर्थक सुनील झंवर याच्यासह अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांना आरोपी करण्यात आले आहे. याचे धागेदोरे गिरीश महाजन यांच्यापर्यंत असल्याचा आरोप ललवाणी यांनी करुन याबाबतची सर्व कागदपत्रे पुणे पोलिसांकडे सादर केल्याचे सांगितले होते. त्यावर महाजन यांनी बीएचआर प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, पोलीस चौकशीत सत्य काय ते बाहेर येईलच असे स्पष्टीकरण दिले.

Web Title: Land acquired in Jamnera, but not in auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.