लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:38 IST2021-01-13T04:38:27+5:302021-01-13T04:38:27+5:30
मेहरुण परिसरातील राज प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन महाविद्यालयात लाल बहादूर शास्त्री स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जयश्री ...

लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी
मेहरुण परिसरातील राज प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन महाविद्यालयात लाल बहादूर शास्त्री स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. सूत्रसंचालन के. डी. बिऱ्हाटे यांनी केले तर व्ही. डी. नेहते यांनी आभार मानले.
-----------------------
मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालय
मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालयात लाल बहादूर शास्त्री व संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथीनिमित्त रोहिणी सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी त्यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. रितेश शिरसाठ, सौरभ पाटील, प्रणाली गायकवाड, दीपा गुप्ता, वैष्णवी निकुंभ, जयेश बावीस्कर, प्रशांत कवळे, स्वाती बावीस्कर, विजय बावीस्कर, मयूर शिरसाठ या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भाषणे दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहिनी चौधरी, रुपाली वानखेडे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, लीना नारखेडे, नरेश कोळी, दीपक भोळे आदींनी परिश्रम घेतले.
०००००००००००००००००००००००
सुजय महाजन विद्यालय
सुजय महाजन विद्यालयात लाल बहादूर शास्त्री व संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अर्चना सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लाल बहादूर शास्त्री व संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. देवीदास बंजारा, गौरव शिरसाठ, प्रतीक्षा भाेलणकर, काजल बंजारा, सिब्बू जाधव, बजरंग तिवारी आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केले. हितेश पाटील, मुक्ता देशमुख, पूजा तवटे यांनी परिश्रम घेतले.