फैजपूर येथील घरफोडीत सव्वा लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: March 27, 2017 13:42 IST2017-03-27T13:42:52+5:302017-03-27T13:42:52+5:30
फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयासमोरील वैशाली नगरात चोरटय़ांनी धाडसी घरफोडी करीत सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लांबवला़

फैजपूर येथील घरफोडीत सव्वा लाखांचा ऐवज लंपास
फैजपूर, ता.यावल, दि.27 - शहरातील धनाजी नाना महाविद्यालयासमोरील वैशाली नगरात चोरटय़ांनी धाडसी घरफोडी करीत सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लांबवला़
ज्योती जावळे यांच्या राहत्या घरात चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्री मागच्या दाराच्या ग्रीलचे कुलूप तोडून प्रवेश केला़ कपाटातील साडेतीन तोळे सोने तसेच 20 हजारांची रोकड आदी मिळून सुमारे एक लाख 25 हजारांचा ऐवज लांबावला़ जळगाव येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आल़े