लाडी, खुरकत आजाराने पशुधन ग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:20+5:302021-09-24T04:20:20+5:30
यावल : शेतकऱ्यांचे सोबती असलेले पशुधन सध्या लाडी व खुरकत आजाराने ग्रस्त आहे. मात्र तालुक्यातील पशुचिकित्सालयात पशुचिकित्सकच उपस्थित ...

लाडी, खुरकत आजाराने पशुधन ग्रस्त
यावल : शेतकऱ्यांचे सोबती असलेले पशुधन सध्या लाडी व खुरकत आजाराने ग्रस्त आहे. मात्र तालुक्यातील पशुचिकित्सालयात पशुचिकित्सकच उपस्थित राहत नसल्याने पशुधनाची दैन्यावस्था पाहता पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांनी पंचायत समितीच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. त्यानुसार बुधवारी गटविकास अधिकारी व उपसभापती योगेश भंगाळे आणि शेखर पाटील यांच्या उपस्थितीत पशुचिकित्सक यांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी केली. यानंतर तालुक्यातील सर्व चिकित्सालयात पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पंचायत समितीच्या सभेतील तक्रारीनुसार यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी उपसभापती योगेश दिलीप भंगाळे, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या प्रमुख उपास्थित तत्काळ दुसऱ्या दिवशी सर्व पशुधन विकास अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत डॉ. एस. एन. बढे, न्हावी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एम.सी. पाटील, फैजपूरचे डॉ. एन. डी. इंगळे, डांभुणीचे डॉ. एम. पी. पाटील, यावलचे डॉ. आर. सी. भगुरे यांच्यासह नायगावचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. सी. एस. पाटील, हिंगोणा येथील डॉ. एन. एम. पाटील, डोंगर कठोऱ्याचे डॉ. यू. एन. पवार, साकळीचे डॉ. युवराज पाटील, आमोदा येथील डॉ. ज्योती पाटील, यावलचे डॉ. आर. पी. ढाके व भालोद येथील डॉ. व्ही.बी. पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत गटनेते शेखर पाटील यांनी तक्रारींचा पाढा वाचला व यापुढे शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या समक्ष तक्रार करणार असल्याचे बैठकीत सांगितले. त्याचा परिणाम म्हणून गुरुवारी सकाळपासून पशुधन वैद्यकीय अधिकारी कार्यालयात उपस्थित दिसल्याचे शेखर पाटील यांनी सांगितले.