पंचक येथून चार बैल चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:30 IST2019-11-05T21:29:45+5:302019-11-05T21:30:11+5:30
बिडगाव, ता.चोपडा : येथून जवळच असलेल्या पंचक येथील शेतकरी तुकाराम हेमा पाटील यांच्या गावाशेजारील गोठ्यातून तब्बल चार बैल चोरीस ...

पंचक येथून चार बैल चोरीस
बिडगाव, ता.चोपडा : येथून जवळच असलेल्या पंचक येथील शेतकरी तुकाराम हेमा पाटील यांच्या गावाशेजारील गोठ्यातून तब्बल चार बैल चोरीस गेल्याची घटना सोमवार रात्री घडली. तब्बल लाखावर किमतीचे बैल चोरीस गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अंकलेश्वर-बºहाणपूर महा मार्गावरील गोठ्यात तीन बैल व एक दोन वर्षाचा गोºहा ही गुरे बांधलेली होती. सकाळी गोठ्यात गुरे नसल्याचे दिसले. त्यांनी ग्रामस्थांसह परिसरात शोध घेतला. मात्र गुरे मिळाली नाहीत.
अडावद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गुरे चोरून महामार्गावर बाहेर पडत काही अंतरावर चारचाकी गाडी उभी करून त्यातून गुरे नेल्याचे बैलांच्या व गाडीच्या चाकांच्या ठश्यांवरून स्पष्ट दिसून आले.