कामगार नेत्याचे कामगार दिनीच झाले निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST2021-05-03T04:11:49+5:302021-05-03T04:11:49+5:30

ममुराबाद : नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय वीज मजदूर महासंघ व महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे ...

The Labor leader died on the same day | कामगार नेत्याचे कामगार दिनीच झाले निधन

कामगार नेत्याचे कामगार दिनीच झाले निधन

ममुराबाद : नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय वीज मजदूर महासंघ व महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उपाध्यक्ष आणि दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे कर्मचारी मच्छिंद्र डिंगबर पाटील यांचे कामगार दिनी शनिवार, १ मे या कामगार दिनीच कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले.

रोजचे काम आणि कामगार चळवळींचा व्याप सांभाळून जन्मभूमी ममुराबाद येथील नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरादेखील ते सांभाळत होते. आपल्या कार्यकाळात नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या ममुराबाद येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात अनेक नवीन उपक्रम राबविण्याच्या बाबतीत ते कायम आग्रही असायचे. नेहमीची व्यस्त दिनचर्या सांभाळून नेहरू विद्यालयाच्या अनेक कार्यक्रमांनाही त्यांची आवर्जून हजेरी असायची.

---------

फोटो- मच्छिंद्र पाटील

Web Title: The Labor leader died on the same day