कुरंगी बांबरूड जि.प. गटात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:28+5:302021-09-19T04:17:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरंगी, ता. पाचोरा : कुरंगी बांबरूड गटात दुचाकी चोरीचे प्रकार वाढत असून आतापर्यंत पाच गाड्या चोरांनी ...

कुरंगी बांबरूड जि.प. गटात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरंगी, ता. पाचोरा : कुरंगी बांबरूड गटात दुचाकी चोरीचे प्रकार वाढत असून आतापर्यंत पाच गाड्या चोरांनी लांबवल्या. त्या गाड्यांचा तपास लागत नाही, तोच पुन्हा दुचाकी दिवसा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.बो. कुरंगी, पहाण, हडसन या गावांत दिवसा तीन दुचाकी तर रात्री दोन अशा पाच गाड्या चोरांनी लांबवल्या. या गाड्यांचा तपास लागत नाही तोच १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता राणीचे बांबरुड गावातील सुभाष विठ्ठल मोरे यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-टी-४५४४) त्यांच्या शेताच्या बांधावरून गाडी अज्ञात चोरांनी चोरी केली आहे. याबाबत गाडीमालकाने पाचोरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिवसा व रात्री सक्रिय झालेल्या चोरांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.
आतापर्यंत या परिसरात बऱ्याच वेळा दुचाकी गाड्या चोरीस गेल्या आहेत. त्यांचा तपास पोलिसांनी लावून चोरट्यांना जेरबंद करावे. जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत दिवसा-रात्री चोरीचे प्रमाण वाढतच जाईल.
- सुभाष विठ्ठल मोरे, शेतकरी, बांबरूड राणीचे, ता. पाचोरा