रोटरी वेस्टच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार वाणी, तर सचिवपदी असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST2021-07-01T04:12:56+5:302021-07-01T04:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या नूतन अध्यक्षपदी कृष्णकुमार वाणी यांची, तर मानद सचिवपदी अनुप ...

रोटरी वेस्टच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार वाणी, तर सचिवपदी असावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या नूतन अध्यक्षपदी कृष्णकुमार वाणी यांची, तर मानद सचिवपदी अनुप असावा यांची निवड करण्यात आली. १ जुलैपासून नूतन कार्यकारिणीचा कार्यकाळ सुरू होणार आहे.
नूतन अध्यक्ष कृष्णकुमार वाणी हे रोटरॅक्टमध्ये सहा वर्षे सक्रीय होते. त्यांनी सचिव व कोषाध्यक्षपद भूषविले आहे. रोटरी वेस्टमध्ये गेल्या बारा वर्षँत त्यांनी कोषाध्यक्ष, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर, सहसचिव, सचिव, उपाध्यक्ष, प्रेसिडेंट इलेक्ट अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच मानद सचिव अनुप असावा यांनी रोटरी वेस्टमध्ये ग्रिटिंग्ज कमिटी चेअरमन, कोषाध्यक्ष, सहसचिव ही पदे भूषविली आहेत.
अशी आहे नूतन कार्यकारिणी
नूतन कार्यकारिणीमध्ये आयपीपी तुषार चित्ते, उपाध्यक्ष योगेश राका, प्रेसिडेंट इलेक्ट सुनील सुखवाणी, कोषाध्यक्ष गौरव सफळे, सहकोषाध्यक्ष देवेश कोठारी, सार्जंट ॲट आर्म्स सचिन वर्मा, सहसचिव विवेक काबरा, कमिटी चेअरमन म्हणून ॲड. सूरज चौधरी, डॉ. राजेश पाटील, विनीत जोशी, विनोद बियाणी, संदीप काबरा, शंतनू अग्रवाल यांचा समावेश आहे. क्लब ट्रेनर म्हणून गनी मेमन, तर संचालक म्हणून सरिता खाचणे, अतुल कोगटा, ॲड. राहुल लाठी यांची निवड करण्यात आली आहे.