कृषी विद्यापीठप्रश्नी केवळ मुदतवाढ मागितली! -डॉ़. व्यंकटेश्वरलू

By Admin | Updated: November 10, 2015 23:30 IST2015-11-10T23:30:34+5:302015-11-10T23:30:34+5:30

कृषी विद्यापीठासाठीच्या अहवालाचे कामही अपूर्ण असल्याने मुदतवाढ मागितल्याचे डॉ़व्यंकटेश्वरलू म्हणाल़े समितीच्या मागणीनुसार डिसेंबर अखेर्पयत मुदतवाढ देण्यात आली आह़े

Krishi Vidyapeeth asked only for extension! -Do. Venkateswarlu | कृषी विद्यापीठप्रश्नी केवळ मुदतवाढ मागितली! -डॉ़. व्यंकटेश्वरलू

कृषी विद्यापीठप्रश्नी केवळ मुदतवाढ मागितली! -डॉ़. व्यंकटेश्वरलू

धुळे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणा:या नवीन विद्यापीठासाठी धुळ्यातील जागा अनुकूल असल्याने या जागेचा अभ्यास करण्यासाठी समितीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती माजी आमदार प्रा़शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली होती़

मात्र कृषी विद्यापीठ विभाजनप्रश्नी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ़ बी़ व्यंकटेश्वरलू यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला असता, कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत मुदतवाढ मागितली आहे. पण धुळ्याची जागा योग्य असल्याचे म्हटलेलेच नाही, असा स्पष्ट खुलासा डॉ़ व्यंकटेश्वरलू यांनी केला आह़े

राहुरी येथील कृषी विद्यापीठ विभाजनाबाबत अहवाल सादर करण्यासाठी ऑक्टोबर अखेर्पयतची मुदत देण्यात आली होती. पण आणखी काही जागांची पाहणी करावयाची असून अहवालाचे कामही अपूर्ण असल्याने मुदतवाढ मागितल्याचे डॉ़व्यंकटेश्वरलू म्हणाल़े समितीच्या मागणीनुसार डिसेंबर अखेर्पयत मुदतवाढ देण्यात आली आह़े कृषी विद्यापीठ नेमके कुठे होणार हे स्पष्ट होण्यास आणखी कालावधी लागणार आह़े सर्व जागांच्या अभ्यासानंतर अहवाल सादर केला जाणार आह़े

कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत आणखी काही जागांची पाहणी करावयाची आह़े तसेच अहवालाचे कामही अपूर्ण आह़े त्यामुळे मुदतवाढ मागितली होती, डिसेंबर्पयत मुदतवाढ मिळाली आह़े

-डॉ. बी़ व्यंकटेश्वरलू

कुलगुरू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी

Web Title: Krishi Vidyapeeth asked only for extension! -Do. Venkateswarlu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.