शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

कोथळी-मुक्ताईनगर, आळंदी, त्र्यंबकेश्वर व सासवड हे वारकऱ्यांचे चार धाम : हभप रवींद्र महाराज हरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:52 PM

एकनाथ भागवत पारायणाची काल्याच्या कीर्तनाने समाप्ती

ठळक मुद्देदहा लाख भाविकांनी घेतला प्रक्षेपणाचा लाभजळगाव जिल्ह्यातील कोथळी, मुक्ताईनगर ही संताची भूमीकाल्याच्या कीर्तनात गाठला गर्दीचा उच्चांक

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर, दि.१८ : टाळ मृदंगाच्या गजरात सुमारे ५० हजार भाविकांच्या उपस्थितीत संत मुक्ताई मंदीरावर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्री एकनाथी भागवत पारायण राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे हभप रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवारी समाप्ती झाली. त्यांनी कोथळी आणि मुक्ताईनगर ही संतांची भूमी आहे. यातही कोथळी धाम सर्वात मोठे असल्याचे विचार व्यक्त केले.समारोपा प्रसंगी काल्याच्या कीर्तनाला गर्दीचा उच्चांक गाठला गेला. टाळ मृदुंगाचा गजर आणि तल्लीन भाविकांच्या पाऊलांनी अवघे क्षेत्र कोथळी मंत्रमुग्ध झाले होते. सभामंडपात संत भक्तांच्या या मेळ्यात भाविक बेभान होते.गुरुवारी सकाळी गाथा पूजन करुन सकाळी १०.३० वाजता रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याच्या कीर्तनाला सुरुवात केली. टाळ मृदुंगाच्या गजरात अतिशय भक्तीमय वातावरणात तल्लीन होत व पावल्या खेळत परीसर दुमदुमला होता. कीर्तनात त्यांनी कोथळी, मुक्ताईनगर ही भूमी संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. राज्यात कोथळी मुक्ताईनगर, आळंदी, त्र्यंबकेश्वर व सासवड ही चार धाम असून कोथळीचे धाम हे सर्वात मोठे धाम आहे. संत भूमी आहे. मुक्ताईसह चारही भावंडांनी संपूर्ण विश्वाला एकतेचा व भक्ती, ज्ञानाचा विचार आणि मार्ग दिला. मुक्ताबाई हे एक शक्तीपीठ व अधिष्ठान असून आपण खºया अर्थाने मुक्ताईचे पाईक आहोत. काल्याचे कीर्तन हे एक साधनेचे एकक असून परीसरातील सर्वांनी तुळशीची माळ घालून मुक्ताई सेवेत यावे. एकादशी व्रत करावे व वारकरी आचार विचार अंगिकारावे असे संबोधन केले.पारायण सोहळा यशस्वीतेसाठी आमदार एकनाथ खडसे, संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, हभप उद्धव जुनारे महाराज, निवृत्ती पाटील, विनोद सोनवणे, ललित बाविस्कर, सदाशिव पाटील, शेखर वानखेडे, चंदू पाटील, ज्ञानेश्वर हरणे, विशाल महाराज खोले यांनी परीश्रम घेतले.दहा लाख भाविकांनी घेतला प्रक्षेपणाचा लाभगेल्या दहा दिवसांपासुन सुरु असलेल्या या कार्यक्रमाचे युटुबवर लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते. चॅनलच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कानाकोपºयात मोबाईलवर दररोज दहा लाखांच्यावर भाविक प्रक्षेपण पहात होते.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगर