जाणता परमार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:47 PM2019-06-24T12:47:47+5:302019-06-24T12:49:12+5:30

अध्यात्म

 Knowledgeable Paramartha | जाणता परमार्थ

जाणता परमार्थ

Next


जाणता परमार्थ हा शब्द जरासा नवीनच वाटतो परंतु ज्ञानदृष्टीने विचार केल्यास त्यातील रहस्य लक्षात येते़ परमार्थ भक्ती, उपासना, आराधना, साधना, यासर्वामध्ये जाणतेपण असणं खूपच महत्वपूर्ण अर्थात आवश्यकच नव्हेतर अत्यावश्क ठरत़ उदा़ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलय ‘गुरू जाणिते भजीजे.. म्हणजेच गुरू जाणतेपणाने भजावा आणि स्वीकारावा़ आपणा सर्वाना जाणता राजा शब्द वा कल्पना माहित आहे़ परंतु मग जाणता परमार्थ म्हणजे नेमकं काय़ परमार्थ व जाणता परमार्थ यामध्ये नेमके साम्य काय़ वा नेमकं वेगळपण काय? आपण सर्व भाविक भक्त श्रद्धाळू भावनेने मंदिरात देवदर्शनासाठी जातो़ तेथील देवळाला प्रदक्षिणा घालतांना प्रदक्षिणा मार्गात देवळाचे मागील बाजूस देवाचे पाठीस (मागचे बाजूस) मस्तक टेकवून नमस्कार करतो़ परंतु त्या भाविकास जर त्याचे कारण विचारले तर सांगता येईलच असे नाही़ फारच आग्रहपूर्वक विचारल्यास माहित नाही़ आधीच्या व्यक्तीने केला म्हणून आम्हीही केला किंवा तुम्हाला वाटले तर करा़ असे सांगितले जाते़ देवाला पाठीमागे नमस्कार करणे हा झाला परमार्थ़ मात्र या मागचे कारण लक्षात घेऊ या़
सतत देवाने आपल्या पाठीशी राहावे, म्हणून देवाचे पाठीमागे नमस्कार करावा़ हा कार्यकारण भाव जाणून आपला परमार्थ करत राहावा यालाच म्हणावे जाणता परमार्थ. यातून आता आपला दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करूया़ श्रद्धेतून दृढ श्रद्धेकडे जावू या़ श्रीमद ्भागवत महापुराणात मन एवं मनुष्याणाम् कारण बंध मोक्षयो़.. असे म्हटले आहे. मनुष्याचे मन हेच त्याला बंधनात टाकायला किंवा मुक्त करायला कारणीभूत होय़ म्हणूनच प्रत्येकाने आपली भक्ती, परमार्थ हा जाणतेपणाच्या जाणीवेतून केल्यास आपला परमार्थ प्रगल्भ दृष्टीने होऊ लागतो व उच्चकोटीच्या परमानंदाची अनुभूती होऊ लागते़ त्यावेळी श्रीमद भागवतामधील श्लोकाचा परमानंद अनुभवता येतो़ प्रपंच वा परमार्थ उभय ठिकाणी ज्ञान, जाणीव, जाणतेपण महत्वाचे ठरते़ भगवतगीतेमध्ये देखिल म्हटले आहे, नही ज्ञानेन सदृश्यं पवित्रामिह विद्यते़ ज्ञानासारखे पवित्र, महत्वाचे दुसरे काहीच नाही़ भगवंत भक्ती म्हणजे भक्ती, ज्ञान, व वैराग्य हि त्रिसूत्री होय़ ज्ञान, जाणतेपण, जाणीवेमधील राणीव याचे महत्व सुभाषितामध्ये देखिल आढळते़ आपल्या धार्मिक कथा प्रसंगामधील कार्यकारणभाव, रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेत परमार्थाकडून जाणता परमार्थ अंगिकारू या़ जसे पार्वतीने अंगावरचा मळ काढून मूर्ती तयार केली़ शबरीने श्रीरामास उष्टी बोरे खाऊ घातली़ या सारख्या कथा प्रसंगा मधील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करू या व जाणत्या परमार्थाचा मार्ग धरू या़
-मुकुंद धर्माधिकारी, जळगाव.

Web Title:  Knowledgeable Paramartha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.