प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर चाकू हल्ला
By Admin | Updated: May 21, 2017 13:04 IST2017-05-21T13:04:24+5:302017-05-21T13:04:24+5:30
सलीम सईद कहाकर (वय 31) या तरुणाला प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन चाकुच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला.

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर चाकू हल्ला
कु-हाड, जि.जळगाव, दि.21 - पाचोरा तालुक्यातील कु-हाड खु. येथे 20 रोजी सलीम सईद कहाकर (वय 31) या तरुणाला प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन घरातुन ओढत मारहाण करीत चाकुच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला. गंभीर अवस्थेत या तरुणाला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
कु:हाड खुर्द येथील सलीम कहाकर याच्यावर प्रेम प्रकरणाच्या संशयानंतर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर तत्काळ पसार झाले. जखमी सलीम याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. हल्लेखोरांवर पिंपळगाव (हरे) पोलीसांनी भादंवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पाचोरा पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड, पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी भेट देउन पाहणी केली.