किशोर राजे निंबाळकर यांनी स्वीकारली जळगाव जिल्हाधिकारीपदाची सूत्रे
By Admin | Updated: March 14, 2017 17:16 IST2017-03-14T16:20:52+5:302017-03-14T17:16:47+5:30
मावळत्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सकाळी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे आपला पदभार सुपूर्द

किशोर राजे निंबाळकर यांनी स्वीकारली जळगाव जिल्हाधिकारीपदाची सूत्रे
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - मावळत्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सकाळी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे आपला पदभार सुपूर्द केला. निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारून आपल्या कारभारास सुरुवात केली.
आज सकाळी कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी निंबाळकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. पदभार हस्तांतरणासंदर्भातील दस्ताएवजांचे यावेळी रुबल अग्रवाल यांनी आपल्या पदाची सूत्रे निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी निंबाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, प्रांताधिकारी अभिजीत भांडे पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, तहसिलदार अमोल निकम तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. स्वागतानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली.