सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:38+5:302021-07-30T04:17:38+5:30
दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ५ पर्यंत प्रभातफेरी होईल. पहाटे पाच ते सहा पांडुरंगाची काकडा आरती होईल. सायंकाळी ५ ...

सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन सप्ताह
दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ५ पर्यंत प्रभातफेरी होईल. पहाटे पाच ते सहा पांडुरंगाची काकडा आरती होईल. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री साडेआठ ते अकरापर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. हा सोहळा गेल्या ६६ वर्षांपासून साजरा होत आहे. दि. ३१ रोजी हभप ज्ञानेश्वर माउली लोंढेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. १ रोजी हभप चिंतामण महाराज आडगावकर यांच कीर्तन, दि. २ रोजी हभप जनार्दन महाराज मराठ खेडेकर यांचे कीर्तन, दि. ३ रोजी हभप मुरलीधर महाराज वजीर खेडेकर, दि. ४ रोजी हभप माधवराव महाराज धानोरकर, दि. ५ रोजी हभप संजय महाराज नांदगावकर, दि. ६ रोजी हभप मुरलीधर महाराज कढरेकर, दि. ७ हभप मुरलीधर महाराज कढरेकर यांचा सकाळी ९ ते ११ काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावर्षी महाप्रसादाचे अन्नदाते युवराज यशवंत महाजन आहेत. कार्यक्रमासाठी गुढे, नावरे, वाडे, पथराड, कोळगाव, धुळे, पोहरे, भडगाव कोळगाव येथील भजनी मंडळी उपस्थित राहणार आहेत. महाप्रसाद दि ७ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आयोजित केला आहे. सायंकाळी ४ वाजता पालखी निघणार आहे.
290721\img_20200719_084145.jpg
गुढे येथील संत शिरोमणी सावता महाराजांची भव्य मृर्ती