राजमानेच्या वारक:याचा नगरजवळ अपघाती मृत्यू
By Admin | Updated: June 16, 2017 13:26 IST2017-06-16T13:26:25+5:302017-06-16T13:26:25+5:30
राजमाने येथील रहिवासी मांगो नथा पाटील (वय 68) या वारक:याचा 16 रोजी सकाळी अहमदनगरजवळ पायी दिंडीत पंढरपूर येथे जाताना ट्रॅव्हल्सने मागुन धडक दिल्याने जागीच मृत्यु झाला.

राजमानेच्या वारक:याचा नगरजवळ अपघाती मृत्यू
ऑनलाईन लोकमत
कळमडू ता. चाळीसगाव,दि.16 : राजमाने येथील रहिवासी मांगो नथा पाटील (वय 68) या वारक:याचा 16 रोजी सकाळी अहमदनगरजवळ पायी दिंडीत पंढरपूर येथे जाताना ट्रॅव्हल्सने मागुन धडक दिल्याने जागीच मृत्यु झाला.
म्हाळसा पिंप्राळा येथील ह .भ .प. सुकदेव महाराज यांच्या दिंडीत मांगो पाटील हे सहभागी झाले होते. ही दिंडी 15 रोजी नगरजवळ प्रवरा संगम येथे मुक्कामाला होती. शुक्रवार 16 रोजी सकाळी पाच वाजता पंढरपूरकडे दिंडी निघाली असता रस्ता ओलांडत असतांना भरधाव येणा:या ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने ते जागीच मरण पावले . मांगो पाटील हे 15 वषार्पासुन पंढरपुरला पायी दिंडीत जात होते . ते अतिशय भाविक व मनमिळावु स्वभावाचे होते. त्याच्या पश्चात प}ी , दोन मुले , दोन मुली , सुना , नातंवडे असा परिवार आहे .