चाकूने भोसकून युवकाची हत्या

By Admin | Updated: June 2, 2014 17:57 IST2014-06-02T17:54:08+5:302014-06-02T17:57:03+5:30

डीजेच्या तालावर नाचण्याच्या व पैशाच्या वादातून एकाने चाकूने भोसकून युवकाची हत्या केल्याची घटना विष्णुनगर भागात शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली.

Killing a young man with a knife | चाकूने भोसकून युवकाची हत्या

चाकूने भोसकून युवकाची हत्या

 

विष्णुनगर परिसर : नाचण्यावरून वाद, दोघांवर गुन्हा दाखल

धुळे : डीजेच्या तालावर नाचण्याच्या व पैशाच्या वादातून एकाने चाकूने भोसकून युवकाची हत्या केल्याची घटना विष्णुनगर भागात शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली. याप्रकरणी मुख्य संशयितास अटक करण्यात आली आहे. याबाबत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विष्णुनगर भागात शनिवारी लग्न समारंभ होता. त्यात सायंकाळी डी.जे. लावला होता. नाचण्यासाठी नातेवाईक व युवकांची गर्दी जमली होती. त्याच वेळेस शंकर नंदलाल जव्हारकर (वय ३५, रा. विष्णुनगर, धुळे), राजेंद्र उर्फ रवींद्र पंडित पवार (रा. मोचीवाडा, धुळे ) हे दोघेही तेथे नाचत होते. त्यांच्यात नाचण्याच्या वादातून जोरदार भांडण झाले. ते विकोपाला गेले. संतप्त राजेंद्रने धारदार चाकूने शंकरच्या छातीवर वार केले. त्यात शंकर जागेवरच मरण पावला. घटनेनंतर राजेंद्रला सोनू यशवंत अहिरे याने पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक निरीक्षक व्ही.एन. मिस्तरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत केले.

Web Title: Killing a young man with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.