कंडारीतील युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 17:11 IST2019-06-09T17:10:57+5:302019-06-09T17:11:31+5:30
घरातच घेतला गळफास

कंडारीतील युवकाची आत्महत्या
भुसावळ : कंडारीतील नागसेन कॉलनीतील रहिवासी पवन सुभाष खैरे (२५) यांने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ८ रोजी दुपारी २ ते ३.३० वाजेच्या दरम्यान घडली. पवन यास दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन हा आरआरबीची तयारी करीत होता,असे सांगण्यात आले.