शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:50 PM

पुण्यातून वॉशिंक सेटरवरुन मध्यरात्री केले पलायन

जळगाव : घरुन शिकवणीसाठी गेलेल्या उदय ज्ञानेश्वर भोई (१३, रा.म्हसावद, ता.जळगाव) याचे काही जणांनी चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी मध्यरात्री पुण्यातील एका वॉशिंग सेंटरवरुन त्याने स्वत:ची सुटका करुन घेत पलायन केले. बुधवारी सायंकाळी हा विद्यार्थी मामासोबत घरी पोहचला.म्हसावद येथे इंदिरानगरात उदय हा वडील ज्ञानेश्वर भिका भोई, आई मंगला, दोन बहिणी प्रतिभा, अर्चना व लहान भाऊ हितेश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तो गावातील शाळेतील नववी इयत्ते शिक्षण घेतो. उदय याने गावात शिकवणी लावली आहे.त्यासाठी सोमवारी तो नियमितप्रमाणे ८.३० वाजता शिकवणीसाठी गेला. सायंकाळी ७.३० वाजूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शिकवणी असलेल्या शिक्षकाचे घर गाठले. याठिकाणी त्याचे दप्तर मिळून आले. उदय नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली.त्याच्या कुटुंबियांसह गावातील नागरिकांनी, तरुणांनी रात्रभर त्याचा पसिरातील विटनेर, जळके, वावडदा या गावांमध्ये शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. यांनतर म्हसावद दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातही कुटुंबिय तक्रारीसाठी गेले मात्र त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीचा सल्ला तेथील कर्मचाऱ्यांनी दिला.गळ्याला चाकू लावून खिशात टाकली पाचशेची नोटउदयने याने दिलेल्या माहितीनुसार, शिकवणी संपल्यानंतर लघवी करण्यासाठी काही अंतरावर गेला. याठिकाणी आधीच तीन अज्ञात व्यक्ती होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवून ‘तु हमारे साथ चल’, असे म्हणत एकाने पाचशे रुपये दिले. हमे जलगाव जाना असे सांगितले. यानंतर दुचाकीवरुन जळगावातील रायसोनी महाविद्यालयाजवळ आणले. याठिकाणी एक कार उभी होती, त्या कारसोबतच्या इसमाला दुचाकी दिली, तिघांनी कारमध्ये बसविले. यानंतर कार निघाली. रस्त्यातच आणखी दोन मुलांना गाडी बसविले. ते दोघेही हसतखेळत असल्याने त्याच्या सोबतचे असावेत, असे उदयचे म्हणले आहे. अशा प्रकार उदयसह सातही जण कारने मध्यरात्री २ वाजता पुण्याला एका वॉशिंगसेंटर पोहचले. तेथे उतरताच तिघांनी कार वॉशिंग करण्यास सांगितले. प्रवासात कारमध्ये बसलेले दोघेही कार धुवायला लागले.भिती वाटायला लागल्याने तिघांचे लक्ष चुकवून पळ काढला. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरुन पळतांना कुत्रेही भुंकत होते, एका व्यक्तीला कोणते गाव आहे हे विचारले असता, पुणे असल्याचे समजले. यानंतर चौकशी करीत पायी बालेवाडीत मामा शंकर भोई यांचे घर गाठले. तेथे मामाला झाल्याप्रकाराची माहिती दिली. मामांनी म्हसावद येथे कुटुंबियांनाही प्रकार कळवून सुखरुप असल्याने सांगितले. त्याचा फोन आल्यानंतर कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.मुलाला पाहताच आईला अश्रू अनावरशंकर भोई यांनी उदयला सोबत घेवून महाराष्ट्र एक्स्प्रेसने भुसावळ गाठले. साकेगाव येथील भाऊ विजय भोई यांच्या घरी आले. तेथून दोघे मामांसह उदय बुधवारी रात्री ७वाजेच्या सुमारास म्हसावद पोहचला. तीन दिवसांपासून बेपत्ता पोटच्या गोळ्याला बघताच आई मंगला यांना अश्रू अनावर झाले. उदयचे मामा विजय इंगळे यांना प्रकाराबाबत विचारला असता, त्यांनी उदयने सांगितलेल्या माहितीला दुजोरा दिला आहे. सकाळी एमआयडीसी पोलिसात जावून तक्रार देणार असल्याचे कुटुंबाने सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव