खावटी अनुदान बँकेत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:20+5:302021-07-25T04:16:20+5:30

जामनेर : आदिवासींसाठी विविध वस्तूंची खरेदी होते, खावटी योजनेंतर्गत त्यांची लाभार्थ्यांना वाटप होऊन रोख रक्कमही दिली जाते. याबाबत ...

Khawati grant deposited in the bank | खावटी अनुदान बँकेत जमा

खावटी अनुदान बँकेत जमा

जामनेर : आदिवासींसाठी विविध वस्तूंची खरेदी होते, खावटी योजनेंतर्गत त्यांची लाभार्थ्यांना वाटप होऊन रोख रक्कमही दिली जाते. याबाबत येत असलेल्या तक्रारी पाहता राज्य शासनाने रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यातच जमा करावी, असे आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.

काळखेडा (ता.जामनेर) येथे आदिवासी विभागाकडून महाजन यांच्या हस्ते सुमारे ३ हजार ५०० लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या खावटी योजनेतील वस्तूंचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. त्यावेळी महाजन बोलत होते. व्यासपीठावर हिरालाल सोनवणे, विलास पाटील, जे. के. चव्हाण, अशोक भोईटे, मांगीलाल गिल, संदीप सरताळे, आदिवासी प्रकल्प अधिकारी सोनवणे, हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

काळखेडा, (ता. जामनेर) येथे आदिवासींना वस्तूंचे वाटप करताना आमदार गिरीश महाजन यांच्यासह अधिकारी.

Web Title: Khawati grant deposited in the bank