खाविआ-मनसे मैत्रीचे नवे पर्व
By Admin | Updated: October 14, 2015 00:06 IST2015-10-14T00:06:20+5:302015-10-14T00:06:20+5:30
खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. भाजपा व राष्ट्रवादीपासून दूर जात मनसेने खाविआ सोबत घरोबा केला आहे.

खाविआ-मनसे मैत्रीचे नवे पर्व
जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला महापालिकेत खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. भाजपा व राष्ट्रवादीपासून दूर जात मनसेने खाविआ सोबत घरोबा केला आहे. भाजपाची केंद्र व राज्यात सत्ता असतानाही त्यांनी शहरवासीयांचा भ्रमनिरास केल्याने शहराच्या विकासासाठी खाविआ सोबत युती करीत असल्याची घोषणा मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी मंगळवारी केली. या युतीमुळे स्थायी समिती सभापतीपद खाविआकडे तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपद मनसेकडे राहिल. स्थायी समिती सभापती पदासाठी ‘खाविआ’तर्फे नितीन बरडे तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी ‘मनसे’च्या खुशबू बनसोडे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. गुरुवार, 14 रोजी सभापतीपदाची निवड होणार आहे. ‘खाविआ’कडे राहिल, असे आम्ही प्रस्तावात म्हटले होते. आठ दिवसांपासून आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा सुरू होती. मात्र, महापौरपद हे भाजपाकडेच राहील; यावर ते ठाम होते. त्यामुळे खाविआ व भाजप यांच्यातील चर्चा फिस्कटली. ‘खाविआ’कडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे महापालिकेत अस्थिर राजकारण होत होते. मात्र, आता ‘मनसे’ ने खाविआसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता खाविआचे 35 व मनसेचे 12 असे एकूण 47 सदस्य संख्या झाली आहे. त्यामुळे आता खाविआचे स्पष्ट बहुमत झाले असून मनपातील अस्थिर राजकारण संपणार असल्याची आशा उपमहापौर सुनील महाजन यांनी व्यक्त केली आहे. ‘ उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिवसभरात दोनच अर्ज मंगळवारी दिवसभरात नितीन बरडे व खुशबू बनसाडे यांचा अर्ज दाखल झाला. दरम्यान, बरडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून नितीन लढ्ढा तर अनुमोदक म्हणून श्यामकांत सोनवणे यांनी स्वाक्षरी आहे. बनसोडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून मंगला चौधरी व अनुमोदक म्हणून शीतल चौधरी यांनी सही आहे. बरडे व बनसोडे यांची निवड निश्चित खाविआ व मनसे एकत्र आल्यामुळे आता मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी नितीन बरडे व महिला व बाल कल्याण समितीपदासाठी खुशबू बनसाडे यांची निवड निश्चित मानली जात आहे. पक्षीय बलाबल स्थायी समितीत महापौरपदही खाविआकडेच राहणार ‘ '' - सुरेश भोळे, आमदार '' - ललित कोल्हे, गटनेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना - नितीन लढ्ढा, नगरसेवक, खाविआ भाजपाचा महापौरपदाचा हट्ट कायम राहिल्याने चर्चा फिस्कटली नगरविकास विभागाचे सचिव निरंजन सैंदाणे यांच्याकडे सभापतीपदाचे अर्ज दाखल झाल्यानंतर उपमहापौर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की खाविआतर्फे भाजपला स्थायी समिती सभापती पदासाठी प्रस्ताव दिला होता. याबदल्यात महापौर व उपमहापौरपद हे सत्तेत असलेल्या