जळगाव : धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथील किशोर निवृत्ती पाटील (वय २२ ह.मु.संजय नगर, उधना, सुरत) या तरुणाचा रविवारी सकाळी उधना, सुरत येथे धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली. या खून प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, किशोर पाटील हा तरुण रविवारी सकाळी उधना येथे घरी झोपलेला असताना एक तरुण त्याला झोपेतून उठवून बाहेर घेऊन गेला.त्यानंतर थोड्याच वेळात याच भागातील सिकंदर नावाच्या तरुणाच्या घरात धारदार शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर सिकंदर स्वत:च शस्त्र घेऊन बाहेर गल्लीत फिरताना दिसला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सिंकदर व एका महिलेला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उधना, सुरत येथेच किशोरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, सिकंदर याने किशोर याला पहाटे चार वाजता फोन केला होता, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतरही त्याने सतत फोन केले. प्रतिसाद मिळत नसल्याने हातीया काल्या नावाच्या व्यक्तीला किशोरला घेऊन येण्यासाठी पाठविले होते.किशोर हा दुकानात कामाला होता. सिकंदरने त्याचा खून का केला याचे कारण समजू शकले नाही. सिकंदर याचा दारु विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, किशोर याचा परिवार अनेक वर्षापासून सुरत येथेच स्थायिक आहे.
धरणगाव तालुक्यातील वाकटूकीच्या तरुणाचा सुरतमध्ये खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:01 IST
धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथील किशोर निवृत्ती पाटील (वय २२ ह.मु.संजय नगर, उधना, सुरत) या तरुणाचा रविवारी सकाळी उधना, सुरत येथे धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली.
धरणगाव तालुक्यातील वाकटूकीच्या तरुणाचा सुरतमध्ये खून
ठळक मुद्देसिकंदरने खून का केला याचे कारण अस्पष्टसंशयित सिकंदर याचा दारु विक्रीचा व्यवसायपोलिसांनी घेतले दोन संशयितांना ताब्यात