शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

चोपड्यात खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:16 PM

साहित्यिक, कलावंतांच्या स्वागतासाठी नटली साहित्य नगरी

चोपडा - येथे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक नगरी चोपडा शहरात प्रथमच जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आज होणार आहे. खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन 'स्व.डॉ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी' परिसरात दजेर्दार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी राज्यासह परप्रांतातून मराठीचे सारस्वत कलावंत, साहित्यिक चोपडा नगरीत दाखल होत आहेत.शहरातील स्व.डॉ.सौ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरीमध्ये प्रथमच होत असलेल्या जिल्हास्तरीय ‘खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन २०१९’चा उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. उद्घाटन अ.भा.मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक फ.मु.शिंदे (औरंगाबाद), साहित्यिक प्रा.डॉ.केशव देशमुख (नांदेड), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवि अशोक सोनवणे (चोपडा), रमेश पवार (अमळनेर), भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मराठी साहित्य अकादमीच्या नवनियुक्त निदेशिका आणि चोपड्याच्या सुकन्या पौर्णिमाबेन हुंडीवाले (ब-हाणपूर), अभिनेता शंभू पाटील (जळगाव), साहित्यिक कुंदा प्रधान (कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.विविध कार्यक्रमांचे नियोजनया संमेलनात दुपारी एक वाजता ‘बोलीभाषांचे मराठी साहित्यात योगदान’ यासंदर्भात परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी कविवर्य अशोक सोनवणे राहतील. तर परिसंवादात डॉ.रमेश सूर्यवंशी (कन्नड), प्रा.वि.दा.पिंगळे (पुणे), डॉ.मिलिंद बागूल (धरणगाव) हे सहभागी होणार आहेत.यावेळी होणाऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान कविवर्य रमेश पवार (अमळनेर) हे भूषविणार आहेत. त्यात प्रा. एस.टी.कुलकर्णी, डॉ.संजिवकुमार सोनवणे, रमेश धनगर, कृपेश महाजन, दिनेश चव्हाण, संजय सोनार, राजेंद्र पारे, अरुण जोशी, ललिता पाटील, प्राचार्य योगिता पाटील, तुषार लोहार, विलास पाटील, किशोर नेवे, बाळकृष्ण सोनवणे, जया नेरे हे कवी सहभागी होणार आहेत. सुत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश माने हे करणार आहेत.दुपारी तीन वाजता साहित्यिक पौर्णिमाबेन हुंडीवाले यांचे कथाकथन होणार आहे. तर दुपारी चार वाजता अभिनेते शंभू पाटील यांचे ‘गांधीजी’ या विषयावर नाट्य अभिवाचन होणार आहे. ‘बहिणाबार्इंच्या काव्यात्मक जीवनाचा भावस्पर्शी प्रवास’ हा एकपात्री प्रयोग सांयकाळी सहा वाजता कुंदा प्रधान (कोल्हापूर) या सादर करणार आहेत. रात्री सात वाजता अपर्णा भट कासार (जळगाव) व समूहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने साहित्य संमेलनाचा समारोप होईल.रसिकांना आवाहनआज महिला मंडळ माध्यमिक शाळेच्या प्रांगणावरील ‘स्व.डॉ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’तील साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात रसिक श्रोते, नाट्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॉ.परेश टिल्लू, तसेच सर्व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.