आॅनलाईन लोकमतरावेर, दि.८ : तालुक्यातील खानापूर येथील लग्न वऱ्हाड इंदूर येथून विवाह करून परत येत असताना मध्यप्रदेशातील कटीघाटात वºहाडींचे वाहन ३० फूट दरीत कोसळून रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात नवरदेवाची मावसबहीण आयेशा शेख रशीद (वय १५ रा.विवरे बु, ता.रावेर) ही जागीच ठार झाली. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख रशीद शेख रफिक यांचा मोठा मुलगा राजू याचा विवाह इंदूर येथील गुलशन ए-साबरी मॅरेज हॉल (हजरत नाहरशाह वली दर्गाह मैदान, खजराना) येथे इजाज कॉलनीतील अमीरखाँ उमरखाँ यांची कन्या सनाबी हीच्याशी रविवारी सकाळी ११ वाजता झाला. सायंकाळी वऱ्हाडींच्या वाहनांचा ताफा परतीच्या प्रवासाला निघाला. इंदूर - अमरावती महामार्गावरील कटी घाटातील वळण रस्त्यावर भरधाव कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या कंटेनरचा कट लागून कारने तीन-चार पलट्या मारत तब्बल ३० फूट खोल दरीत कोसळली. सदर वऱ्हाडींच्या ताफ्यातील मागून येणारी वाहने घटनास्थळी तत्काळ पोहचल्याने पोलिसात व नजीकच्या असिरगड येथील नातेवाईकांना खबर देवून मदतीची हाक दिली. तातडीने मदतकार्य करून घटनास्थळी जागीच ठार झालेली नवरदेवाची मावसबहीण आयेशा शेख रशीद (१५ ) रा विवरे बु ता रावेर हीचा मृतदेह व कारमधील गंभीर जखमी वऱ्हाडींना बाहेर काढून बऱ्हाणपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात मयताचे वडील शेख रशिद शेख छोटू व आई मेहमूनाबी शेख रशिद तायराबी शेख गनी (रा विवरे बु) यांच्यासह सायराबी पती शेख रफीक, तायराबी शेख गनी (दोन्ही रा.खानापूर, ता रावेर), शहनाज नदीमखान व फिरोजखान हैदरखान (रा बिरोदा ता. बऱ्हाणपूर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. चालक शालिग्राम दयाराम (आडनाव माहीत नाही) हा गंभीर जखमी आहे. त्याला पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे.दरम्यान, नवरदेवाची मयत मावसबहीण आयेशा शेख रशीद (१५ ) हिच्या मृतदेहाचे बऱ्हाणपूर येथे शवविच्छेदन करून सकाळी विवरे बुद्रुक येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खानापूरच्या लग्न वऱ्हाडाचे वाहन ३० फूट दरीत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:23 IST
कटीघाटातील अपघातात नवदेवाची मावसबहिण जागीच ठार तर आठ जण जखमी
खानापूरच्या लग्न वऱ्हाडाचे वाहन ३० फूट दरीत कोसळले
ठळक मुद्देविवरे बु येथील नवरदेवाची मावसबहीण जागीच ठारमध्यप्रदेशातील कटीघाटात झाला भीषण अपघातवऱ्हाडींच्या कारमधील आठ जण गंभीर जखमी