खामखेड्यात दोन घरांमधून लाखोचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:30 IST2019-06-17T14:29:55+5:302019-06-17T14:30:37+5:30
सतत घडत असलेल्या घरफोडींमुळे ग्रामस्थ धास्तावलेले

खामखेड्यात दोन घरांमधून लाखोचा ऐवज लांबविला
मुक्ताईनगर : तालुक्यातील खामखेडा येथील दोन घरांमधून चोरट्यांनी २ लाख ७१ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविल्याची घटना १५ रोजी रात्री घडली. सतत घडत असलेल्या घरफोडीमुळे ग्रामस्थ धास्तावलेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून तालुक्यातील खामखेडा येथील भास्कर सापुर्डा पाटील हे शनिवारी रात्री कुटुंबीयांसह घराबाहेर अंगणात झोपलेले होते. त्यांच्या घराचा दरवाजा आडवा केलेला होता. हिच संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटीतील सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम लांबविली. याचवेळी शेजारील अशोक बळीराम पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडीकोयंडा उघडून चोरट्यांनी त्यांच्याही घरात प्रवेश केला.
भास्कर पाटील व अशोक पाटील या दोघांच्या घरातून २ लाख ७१ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिन व रोख रक्कम घेवून चोरट्यांनी पोबारा केला. घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधिकारी यांनी पाहणी केली. जळगावचे ठसे तज्ज्ञ व श्वानाला पाचारण करण्यात आले होते. परंतु पुढे तपास लागला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.