खडसेंचा ‘शब्दभेदी बाण’ कुणाला घायाळ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:06 PM2020-09-13T23:06:23+5:302020-09-13T23:08:13+5:30

राजरंग जळगावचे...

Khadse's 'word-breaking arrow' will hurt anyone | खडसेंचा ‘शब्दभेदी बाण’ कुणाला घायाळ करणार

खडसेंचा ‘शब्दभेदी बाण’ कुणाला घायाळ करणार

googlenewsNext




- विलास बारी
जिल्ह्यातील राजकारण आता नव्या वळणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अभ्यासू आणि प्रशासनातील चांगली जाण असणाऱ्या माजी मंत्री खडसे यांनी विरोधी पक्ष नेता असताना सत्ताधारी आणि विरोधकांना आपल्या शब्दभेदी बाणांनी घायाळ केले आहे. मात्र हेच बाण आता स्वकियांविरूद्ध वापरले जात असल्याने खडसे यांचे हे बाण आणखी कुणाला घायाळ करतील हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्यपाल, राज्यसभा आणि विधान परिषद या सर्व आश्वासनांची पूर्ती न झाल्याने स्वत: खडसेदेखील सध्या निर्णायक मुडमध्ये दिसत आहेत. या साºयात नेहमीप्रमाणे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे-फडणवीस प्रकरणावर भाष्य टाळले आहे.
व्हिडीओ क्लिप आणि जळगाव...
राजकारणात मनी, पॉवर आणि मसल हे तीन फॅक्टर महत्त्वाचे आणि यशाचे मार्ग ठरतात. यासाºयाला आता ‘हनी ट्रप’सह वेगवेगळ्या माध्यमातून संपविण्याचे प्रकार सुरु झाले आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका तत्कालिन खासदाराचे तिकिट कापण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा वापर झाला. या निवडणुकीत दोघांचा वाद आणि तिसºयाचा लाभ असा परिणाम दिसून आला. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या माजी मंत्र्याच्या पीएची एका महिलेसोबतची अश्लिल क्लिप वरिष्ठांकडे सोपविल्याचा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी केला आहे. याबाबत त्यांनी जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांना विचारण्यास सांगितले असताना लोढा यांनीदेखील आपल्याकडे अनेक कारनामे असल्याचे सांगत दुजोरा दिला आहे. सध्या ते माजी मंत्री त्यांचे स्वीय सहाय्यक कोण? हा प्रश्न अनुत्तरिय असला तरी पुन्हा एकदा व्हिडिओ क्लिप पुराण पुढे आले आहे. हे व्हिडिओ क्लिप पुराण जिल्ह्याच्या राजकारणात कोणते वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नेहमीप्रमाणे यासाºया प्रकारावर भाष्य करणे टाळले आहे.
खडसे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांनादेखील वरिष्ठ नेतेच उत्तर देतील असे सांगत त्यांनी पुन्हा मुरब्बीपणा दाखविला आहे.
सेनेतही वर्चस्वाचे बाण
भाजपमधील अंतर्गत गटबाजी सुरु असताना शिवसेनेला जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी चांगला वाव आहे. त्यादृष्टीने सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रयत्नदेखील सुरु केले आहेत.
ज्या भागात सेनेचे वर्चस्व नाही त्या भागाची जबाबदारी त्यांनी सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती. तीन पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात भाजपची आंदोलने आता आक्रमक पद्धतीने होत आहे.
चाळीसगावे भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात आंदोलन करून शिवसेनेने जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मात्र सध्या सेनेमध्ये वर्चस्वाचे अंतर्गत शब्दभेदी बाण सुरु आहेत. एरंडोल येथील कोविड सेंटरमधील सुविधांच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील व पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यात कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींच्या मैदानात उतरण्यावरून रणकंदन सुरु झाले.
आमदार चिमणराव पाटील यांच्याकडून पलटवार झाला. याठिकाणी पालकमंत्र्यांनी मुरब्बीपणा दाखवित विषय न वाढविता त्यावर पडदा टाकला. त्यामुळे सध्यातरी हा वाद शांत झाला आहे.

Web Title: Khadse's 'word-breaking arrow' will hurt anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.