मुक्ताईनगर, जि.जळगाव : महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्रकाशित संताचे जीवन प्रसंग या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याने पुस्तकावर बंदी घालून जाहीर माफी मागावी, अशी मागणी फडकरी कीर्तनकार महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामी हे पुस्तके संत तुकाराम महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची बदनामीकारक मजकूर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पुस्तके रद्द करणे व संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या युवकांनी याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.निवेदन देते वेळी रवींद्र महाराज हरणे, पंकज महाराज पाटील, उद्धव महाराज जुनारे, कृष्णा महाराज तायडे, रतिराम महाराज शास्त्री, ज्ञानेश्वर महाराज सोनवणे, विशाल महाराज पाटील, नितीन महाराज आहिरे, दीपक महाराज पाटील, विजय महाराज खबके उपस्थित होते.दुसरे निवेदन देतेवेळी फौंडेशन अध्यक्ष छबिलदास पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, दिनेश कदम, भागवत पाटील, धनंजय सापधरे, प्रशांत वाघ, विजय पाटील, सुभाष पाटील, रवींद्र पाटील, महावीर जैन, भोला पाटील, प्रदीप पाटील, सोपान मराठे, ईश्वर पाटील उपस्थित होते.
आक्षेपार्ह लिखाण पुस्तकावर बंदी घालण्याची कीर्तनकार महासंघाची मागणी- मुक्ताईनगर येथे दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 16:48 IST
महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्रकाशित संताचे जीवन प्रसंग या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याने पुस्तकावर बंदी घालून जाहीर माफी मागावी, अशी मागणी फडकरी कीर्तनकार महासंघाने केली आहे.
आक्षेपार्ह लिखाण पुस्तकावर बंदी घालण्याची कीर्तनकार महासंघाची मागणी- मुक्ताईनगर येथे दिले निवेदन
ठळक मुद्देबदनामीकारक मजकुरामुळे दोन समाजात निर्माण होऊ शकते तेढसंबंधितांवर गुन्हा दाखल करावा