आईच्या संस्काराची शिदोरी प्रत्येक मुलाचा संचित ठेवा

By Admin | Updated: May 14, 2017 18:38 IST2017-05-14T18:38:08+5:302017-05-14T18:38:08+5:30

नंदुरबारातील उद्योगपती मनोज रघुवंशी यांनी आईविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Keeping the memory of your mother's body sacred | आईच्या संस्काराची शिदोरी प्रत्येक मुलाचा संचित ठेवा

आईच्या संस्काराची शिदोरी प्रत्येक मुलाचा संचित ठेवा

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 14 - आईची सेवा हीच खरी ईश्र्वरसेवा आहे. प्रत्येकाने आईचे संस्कार, ममता दिलेल्या शिक्षणाची शिदोरी कधीही विसरू नये.. नंदुरबारातील उद्योगपती मनोज रघुवंशी यांनी आईविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आईच्या महतीविषयी आणि तिने दिलेल्या संस्काराविषयी मनोज रघुवंशी म्हणाले, आपण अजूनही आईचे रोज पाय दाबून सेवा  करतो.  आई ही  सर्वानाच अत्यंत प्रिय असून पुजनीय आह़े त्यामुळे माङयासाठी प्रत्येक दिवस हाच मातृदिन असल्याचे रघुवंशी यांनी गर्वाने सांगितले. ब:याच वेळा मनाची काही व्दीधा स्थिती झाल्यास आईचा आधार वाटतो. अशावेळी तिचे मार्गदर्शन घेतो. आपल्यासाठी आईचा  शब्द अंतीम असल्याचेही त्यांनी सांगितल़े आई ही सर्वानाच पूजनीय असल्याने प्रत्येकानेच कुठल्या ना कुठल्या मार्गाने आईची सेवा करायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला़

Web Title: Keeping the memory of your mother's body sacred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.